पान:सभाशास्त्र.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६५ सार्वजनिक सभातंत्र नसते, कोणालाही उपस्थित केलेल्या मुद्दयांना अगर टीकेला उत्तर देतां येत नाही. शिवाय असल्या उल्लेखाने सभेत क्षोभ होऊन शांतपणे संपत आलेली सभा गोंधळांत अगर गडबडत विराम पावते. ज्यांचे आभार मानावयाचे असतील, त्या सर्वांचा अगदी थोडक्यांत उल्लेख असावा, व तो उल्लेख प्रस्तुत असावा. आभाराचे निमित्त करून अप्रस्तुत कार्याचा, अगर गोष्टींचा उल्लेख करून, केलेली स्तुति अगर गुणग्रहण यथार्थ असले तरी अप्रासंगिक ठरते. केलेल्या कार्याने जो परिणाम झालेला असतो, तो प्रचारात्मक आभार मानण्याने वाढत नाही, उलट कमी होतो. त्यांचे व ज्यासाठी आभार मानावयाचे त्याबद्दलचे टिपण करणे जरूर असते, आठवेल तसे अगर सभेत सुचविले जाईल तसे आभारप्रदर्शन करणे, अव्यवस्थित तर असतेच, पण मागाहून अनेक कटकटी पण त्यांतून निघतात. म्हणून ठराव करण्यापूर्वी टिपण करून त्याचा समावेश त्यांत करावा; ठरावाशिवाय आभार मानावयाचे असतील तर, ते टिपण आभार मानणाच्याने स्वतःजवळ घेऊन, त्याप्रमाणे आभार मानावेत. आभार मानणारे इसम योजून ठेवून त्यांना माहिती दिलेली असावी. जबाबदार व समयज्ञ माणसाने आभार मानणे श्रेयस्कर असते. झालेले सर्व गोड मानून घेण्याबद्दल सांगणारा इसम, शब्दमत्सर करणारा, अधीर व संतापी नसावा, कोणी तरी उठावें कोणाचे कसे तरी आभार मानावे हे सभाचालकांना कमीपणा आणणारे आहे. आभारप्रदर्शनाचा ठराव संमतीसाठी मतास मांडला पाहिजे. सभेत घडलेल्या घटनांचे दृष्टीने सभेला कांहीं खुपेल असे त्या ठरावांत असू नये हे इष्ट ठरतें, आभारप्रदर्शनाचा ठराव एकमतानें, अगर बिनविरोध झाल्याने, सभेच्या लौकिकांत भर पडते. आभारप्रदर्शनांत मतभेद होणे अनिष्ट आहे; याचा अर्थ सभेतील वातावरण खेळीमेळीचे राहिले नाही इतकेच नव्हे तर, मतभेद हे वैराचे रस्त्यावर मार्ग चालत आहेत असा होतो. सभेचा उद्देश नाना मते ऐकून त्यांचा समन्वय करून सामुदायिक अभिप्राय विचारविनिमय करून विवेक बुद्धीने स्पष्ट करावयाचा हा असतो. सभेच्या निर्णयांत व चर्चेत सर्वांनी भाग घेतला आहे, व झालेला निर्णय सर्वाचा आहे म्हणून सर्वांना त्याबद्दल आपलेपणा वाटला पाहिजे. हा सभेबद्दलचा भाव जर सभा समाप्तीनंतर शिल्लक राहणार नसेल तर एका अर्थाने सभा विफल झाली असे म्हणणे प्राप्त होते. स...५