पान:सभाशास्त्र.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ६४ م جھے بھی ہوتی تھی تو یہ تو تھی تو सहकार्याबद्दल, सभाकार्य व्यवास्थत पार पाडल्याबद्दल आभार मानावे. कांही कमीजास्त झाले असल्यास त्याबद्दल योग्य शब्दांत खुलासा करून वैयक्तिक कडवटपणा कोठे उत्पन्न झाला असल्यास तो कमी करण्याचा प्रयत्न करावा. स्वयंसेवक व सभाचालक यांचेही आभार मानावे, । सभासमाप्तिः–सार्वजनिक सभेची समाप्ति, जाहीर सभाकार्य संपलें म्हणजे होते, अपुरें कार्य करून सभासमाप्ति करावयाची असेल तर, सभेची संमति पाहिजे, अध्यक्षास वेळ नाहीं अगर अन्य काही कारणासाठीं अध्यक्षास जावयाचे असेल, तर दुसरा अध्यक्ष सभेने नेमावा व काम पुरें करावें. तसेच अध्यक्षाने अध्यक्षस्थान सोडून दिलें एवढ्याने सभेची समाप्ति होत नाहीं. ताबडतोब दुसरा अध्यक्ष सभेने निवडून सभा चालू करून काम संपवावे, अध्यक्षाशिवाय सभेतील कार्यास कायदेशीरपणा व प्रामाण्य येत नाहीं. जाहीर कार्य संपल्याशिवाय अगर सभेची संमति घेतल्याशिवाय सभा संपत नाही. केवळ सभा अध्यक्षाने रद्द केली अगर संपली असे म्हणण्याने ती तशी होत नाहीं. शांततेचा भंग झाला असेल व त्यामुळे सभाकार्य करणे अशक्य झाले असेल तरच अध्यक्षाला सभा रद्द अगर तहकूब करण्याचा अंगभूत अधिकार आहे. अन्यथा तसे करण्यास सभेच्या संमतीची जरूरी आहे. जाहीर केलेले सभाकार्य संपल्यानंतर दुसरे कार्य त्या सभेला चालू करण्याचा अधिकार नाहीं. जाहीर न केलेले असे दुसरें कार्य सर्व सभासदांन चालू करावे असे म्हटले तरी ते घेणे अयोग्य आहे. कारण जे गैरहजर आहेत त्यांचेवर ते अन्यायकारक आहे. म्हणून जाहीर कार्य संपताच अध्यक्षाने सभा समाप्त झाली असे जाहीर केलेच पाहिजे. आभारप्रदर्शनः–जाहीर केलेले सभाकार्य संपतांच अध्यक्षाचा समारोप व त्यानंतर सभासमाप्ति हा क्रम नियमांना धरून आहे. तथापि आभारप्रदर्शन हें एक सभेचे अखेरचे कार्य समजण्यांत येते; म्हणून समारोपाचे शेवट अध्यक्षानें “सभेपुढील कार्य संपलें आहे, आभारप्रदर्शन व राष्ट्रगीत (कार्यक्रमांत असल्यास ) होऊन सभा समाप्त होईल' असे जाहीर करावे. आभारप्रदर्शन ठरावानें अगर ठरावाशिवायही होऊ शकते. आभारप्रदर्शन म्हणजे आभारप्रदर्शनच असावे; त्या भाषणांत झालेल्या चर्चेचा, अगर ठरावांचा ऊहापोह नसावा. आभारप्रदर्शनाचे निमित्त करून लांबलचक व्याख्यान श्रोत्यांवर लाढू नये, अगर वैयक्तिक टीकाही कोणावर करू नये. कारण त्यानंतर चच