पान:सभाशास्त्र.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६३ सार्वजनिक सभातंत्र अगर व्याख्यात्याचे भाषण ऐकण्यासाठी आलेली असते. उपस्थित सभेचा गैरफायदा घेऊन अध्यक्षाने समारोपाऐवजी लांबलचक व्याख्यान सभेवर लादू नये. मोठ्या पुढा-याचे अगर विद्वानाचे व्याख्यानाचे वेळी अध्यक्षाचा मान मिळाला तो समारोप न करतां, अगर नाममात्र केल्याने, बहुतेक प्रसंगी यथार्थ ठरतो. जेथे अध्यक्ष व व्याख्याता समान लायकीचे आहेत अगर अध्यक्ष अधिक लायक आहे अशाही स्थितींत लांबलचक समारोप इष्ट ठरत नाहीं. व्याख्यात्याने जर एक तास अगर जास्त वेळ घेतला असला तर अध्यक्षाने आपला समारोप केव्हाही लांबवू नये. अर्धा तास ही कमाल सीमा सामान्यतः असावी. व्याख्यान ऐकून लोक कंटाळलेले असतात. सभेतून उठून जाणारांची गडबड सुरू होण्यापूर्वीच समारोप पुरा होण्यांत प्रतिष्ठा आहे. | सभाकार्य जर ठरावरूपाने झाले असेल तर अध्यक्षाने थोडक्यांत सभेनें पास केलेल्या ठरावांचे सार सांगावे; त्यांतून उत्पन्न होणान्या जबाबदारीकडे लक्ष वेधावें; कांहीं कार्यक्रम दिग्दर्शित केला असेल तर त्याच्या मर्यादा सांगाव्यात, सभेचे निर्णय अमलात आणावयाचे असतील तर, ते अमलांत आणण्याचे काम प्रयत्न करण्यास सांगून सर्वांना सहकार्याची विनंति करावी, समारोप म्हणजे झालेल्या चर्चेचे पुनरुच्चारण नव्हे. झालेल्या निर्णयाचे निरीक्षण व महत्त्व पटवून देणे आहे व तेही थोडक्यात व कार्यप्रवण करण्याचे दृष्टीनें, सभेत केवळ मतप्रदर्शनाचे दृष्टीने अनेक भाषणे झाली असतील तर, त्यांचा थोडक्यांत परामर्ष घेऊन आपली विचारसरणी अध्यक्षाने मांडावी. अध्यक्षाचे भाषणाने सभेत काय झाले याचे थोडक्यांत चित्र श्रोत्यांचे डोळ्यांपुढे उभे राहिले पाहिजे. समारोपानंतर झालेल्या कार्याबद्दल सभेला नुसते समाधानच वाटले पाहिजे असे नव्हे, तर सभासदांत स्फूर्ति व आशा उत्पन्न होईल अशी तिची समाप्ति झाली पाहिजे; व हे कार्य कुशल समारोपाचे आहे. नाटकांतील अखेरच्या अंकाचा परिणाम, गाण्याच्या बैठकीतील शेवटच्या विजेची गोडी, कादंबरीच्या शेवटच्या प्रकरणांतील घटना, याप्रमाणेच सभेचा समारोप महत्त्वाचा असतो व श्रोत्यांचे मनावर अखेरची पकड तो घेत असते. म्हणून समारोप थोडक्यांत पण चटकदार व सभेच्या कार्याशीं व उपस्थित झालेल्या वातावरणार्थी लयबद्ध असावा. तो संपताच श्रोत्यांना तप्त झाला असे वाटले पाहिजे व उन्नत वातावरणांत सभा समाप्त झाली पाहिजे. समारोपाचे भाषणांत अध्यक्षाने, श्रोत्यांचे, आणि वक्त्यांचे, केलेल्या