पान:सभाशास्त्र.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ६२

सभेचा समारोप अध्यक्षाने करावयाचा असतो. पुष्कळ वेळां कार्यक्रम-त्रि- तील अगर जाहीर निमंत्रणांतील सर्व बाबी पुन्या करता येत नाहींत, त्या वेळी सभेच्या संमतीने सभाकार्य जेवढे प्रत्यक्ष झाले असेल तेवढेच सभाकार्य समजून अध्यक्ष समारोप करू शकतो. सामान्यतः जे सभाकार्य म्हणून जाहीर झाले असेल, अगर अध्यक्षाने प्रास्ताविक भाषणांत जाहीर केले असेल, तेवढे संपल्याशिवाय सभा संपावण्याचा अध्यक्षास अधिकार नाहीं. तथापि, स्थल, काल, परिस्थिति लक्षात घेऊन अध्यक्षाने सभेची संमति घेऊन सभा संपविणे प्रसंग इष्ट ठरते. जागा अपुरी पडली, वेळ फार झाला, व सभास्थान खाली करून देणे आहे, लोक उठून चालले, अगर प्रक्षोभ उत्पन्न होत आहे, व सभा चालू ठेवल्यास शांतताभंग होण्याचा संभव आहे, अशी परिस्थिति असेल तर अध्यक्षाने धोरणाने वागून, सभेची संमति घेऊन सभा संपवावी; व अशा प्रसंग समारोप न करतांच अगर नाममात्र करतांच सभा संपवावी. जेथे जाहीर सभाकार्य यथासांग पार पडले आहे, तेथे सभाकायला अनुसरून अध्यक्षाने समारोप करावा. सभाकार्य केवळ एखाद्याचे व्याख्यान असेल, अगर जेथे ठराव अगर मतप्रदर्शन नसेल, तेथे विषयासंबंधी आपले म्हणणे काल व सभेचा कल पाहून थोडक्यांत अगर विस्तारशः मांडावे, अध्यक्षपद मिळाल्याने सर्वज्ञता अगर सर्वविषय-पारंगतता येते, अगर वाटेल ते व वाटेल तसे बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो असे नव्हे. व्याख्यानांतल न्यून पुरते करून घेण्याचा अधिकार अध्यक्षास आहे; तथापि त्या विषयाचे ज्ञान व अभ्यास असेल तर अध्यक्षाने या भानगडीत पडावें, अनुरूप अध्यक्षाची योजना नेहमी होतेच असे नाही. व्याख्यात्यापेक्षा आपणाला काही तरी प्रस्तुत विषयासंबंधी अधिक ज्ञान आहे हे दाखविण्याचा मोह नेहमी उत्पन्न होतो व त्या मोहाला बळी पडल्याने अनेक अध्यक्ष हास्यास्पद ठरले हे अनुभवाला आलेले आहे. तज्ज्ञ व विद्वान् व्याख्यात्यानंतर, कांहीं तरी शंका अगर प्रश्न अध्यक्षाने उत्पन्न करून विषयाचा आपला व्यासंग सूक्ष्म व दांडगा आहे हैं। दाखविण्याचा प्रयत्न करणे कित्येक अध्यक्षांना कर्तव्यकर्म आहे असे वाटते. अध्यक्षाचे कर्तव्य, सभानियमन व नियंत्रण आहे. चर्चेत भाग घेणे, विषयाचा समारोप करणे हे सगळे दुय्यम आहे. व्याख्यात्याशी मतभेद असेल, पण अवश्य व इष्ट असेल तरच त्याचा ऊहापोह करावा, नाहीं तर मतभेद आहे व तो थोडक्यात काय आहे हे सांगून समारोप पुरा करावा. सभा, मुख्य वक्त्याचे