पान:सभाशास्त्र.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ६ ० बाजूचा एकेक प्रतिनिधि घेऊन प्रत्यक्ष हात मोजावेत व त्याप्रमाणे निकाल द्यावा. निकाल दिल्यानंतर मोजणींत चूक झाली असे ताबडतोब नजरेस आले तर पुन्हा मोजणी करावी. तसा अध्यक्षांना हक्क आहे, मात्र तो ताबडतोब बजाविला पाहिजे; कारण निर्णय जाहीर केल्यानंतर तेवढ्यापुरते त्या विषयाबाबतचे अध्यक्षाचे अधिकार संपतात, अध्यक्षाने आपल्या अंदाजाप्रमाणे अगर मतमोजणी करून निकाल जाहीर केल्यानंतर तो अमान्य असल्यास, अमान्य असणारांनी ताबडतोब पोल, पोल' म्हणून ओरडून पोलची मागणी करावी. मागणीशिवाय अध्यक्षाने पोल' घेऊ नये. पोलची मागणी वास्तविक ज्यांचे विरुद्ध निकाल असेल त्या पक्षाने करावयाची असते; म्हणून ज्या पक्षाप्रमाणे निकाल झाला असेल त्याने मागणी केल्यास अध्यक्षाने ती नाकारणे गैर नाहीं. ज्यांचे विरुद्ध निकाल गेला त्यांनी मागणी केल्यास अध्यक्षाने ती मागणी मान्य केली पाहिजे. जर मतमोजणींत प्रचंड फरक असेल, व पोलची मागणी करण्यांत शुद्ध व प्रामाणिक हेतु नाहीं अशी अध्यक्षाची खात्री झाली असेल, तर सार्वजनिक सभेतील परिस्थिति लक्षांत घेता, अध्यक्षाने ती प्रसंग नाकारणें गैर नाहीं; अन्य परिस्थितीत ती मान्य केली पाहिजे. सभागृह गच्च भरले आहे, सभागृह ठरलेली वेळ झाली म्हणून खाली करणे आहे, सभास्थानी पोल घेणे सहज सुलभ न होतां गोंधळ होण्याचा संभव असेल तर तो नाकारणे हे योग्य ठरेल, पोल याचा अर्थ एकएक मत मोजून संख्या निश्चित करणे हा आहे, पुन्हा मोजणी करणे आहे, त्याचबरोबर पोल मागणे म्हणजे अध्यक्षाचे निकालावर सभेकडे अपील करणे आहे व हा निकाल सभेने द्यावयाचा आहे. शक्यता व व्यवस्था असेल तरच सार्वजनिक सभेत पोल घ्यावा. पेट्या ठेवून, मतपत्रिका देऊन अगर सह्या घेऊन पोल घेणें सार्वजानिक सभेत शक्य नाहीं. पोल देणे ठरल्यास अध्यक्षाने ठरावाच्या बाजूचे लोकांना सभास्थानाच्या एका भागांत व विरोधी लोकांना दुस-या भागांत जाण्यास सांगावें; दोहोंमध्यें अंतर ठेवून स्वयंसेवक उभे करावेत व ये जा बंद करावी. प्रत्येक पक्षाचे दोन दोन प्रतिनिधि घेऊन एक हा, व एक हा, अशा दोन जोड्या करून त्यांना एक एका भागाला याप्रमाणें वांटून मोजणी करण्यास सांगावे. त्यांची मोजणी झाली की त्यांचे रिपोर्ट लेखी घ्यावेत. हे सर्व काम होत असतांना देखरेख ठेवून शांतता ठेवण्यासाठी जरूर ती दक्षता घ्यावी. मतमोजणीदार (Tellers) यांचे लेखी