पान:सभाशास्त्र.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५९ सार्वजनिक सभातंत्र सांगण्याने महत्त्व येते. विषयाचे महत्त्व, एकमताची इष्टता व प्रासंगिकता लक्षात घेऊन जरूर असेल तर वरील दृष्टीने उपसूचना मांडणारांस विनंति करणे योग्य होईल; अन्यथा सभेचा निष्कारण वेळ जातो. असल्या उपसूचनाचा निकाल मतास झटपट टाकून लावता येतो. . ठरावाला चांगले स्वरूप येण्यासाठी, तो अर्थपूर्ण व प्रभावी करण्यासाठी प्रामाणिक बुद्धीनें कांहीं उपसूचना येत असतात. योग्य त्या उपसूचना ठराव मांडणाराने स्वीकाराव्यात व त्याप्रमाणे त्या स्वीकारल्या जातात. अर्थात् ठराव मांडणाराने उपसूचना स्वीकारली म्हणून ती सभेला मान्य आहे असा अर्थ नाहीं. सभेने प्रत्यक्ष मत दिल्याशिवाय सभेची मान्यता सिद्ध होत नाहीं. । मताचा विषय, ठराव, सूचना अगर उपसूचना जी मतास घालावयाची असेल ती, अध्यक्षाने वाचून दाखवावी, पुष्कळ वेळां उपसूचना आणणारांचे नांव घेऊनही हे काम भागते. 'मी आतां अमक्याची उपसूचना मतास घालत' असे म्हणूनही मते घेता येतात. या सूचनेचे, उपसूचनेचे, ठरावाचे अगर अमुक मताचे जे असतील त्यांनी हात वर करावेत' असे म्हणून अध्यक्षाने सभास्थान नीट पाहावे. हातांचा साधारण अंदाज मनाशी करावा, व नंतर हात खाली करण्यास सांगावे. नंतर ‘याविरुद्ध जे असतील त्यांनी हात वर करावेत' असे म्हणून सभास्थान नीट पाहून हातांचा साधारण अंदाज करावा व नंतर हात खाली करण्यास सांगावें. जेथे विरोधी एकही होत नाहीं तेथे एकमताने ठराव (अगर जे असेल तें ) पास झाला असा निर्णय जाहीर करावा. कांहीं वेळां ठराव लोकांना पसंत नसतो, पण ते विरोध करीत नाहीत, तटस्थ राहतात. कोण तटस्थ आहेत' असे आपण होऊन अध्यक्षाने विचारण्याचे कारण नाही. मात्र त्याने स्वतः अगर सूचनेवरून विचारल्यास व कांहीं तटस्थ आहेत असे आढळून आल्यास व विरोधी हात नसल्यास ‘विनविरोध ठराव पास झाला असे जाहीर करावे, जेथे ‘विरोधी हात संख्येने थोडे व बाजूने दिलेले हात संख्येने निःसंशय अधिक आहेत, असे अध्यक्षास वाटल्यास ‘ठराव (अगर जे असेल तें ) बहुमताने पास झाला' असा निर्णय जाहीर करावा. जेथे विरोधी हात संख्येने निःसंशय अधिक आहेत असे अध्यक्षास वाटेल तेथे अध्यक्षाने ठराव (अगर जे असेल तें ) बहुमताने नापास झाला' असा निर्णय जाहीर करावा. जेव्हां परािस्थात काय आहे हैं। नक्की अंदाजतां येत नसेल तेव्हां पुन्हा हात वर करण्यास सांगून दोन्ही