पान:सभाशास्त्र.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संभाशास्त्र ५८ अध्यक्षाने निर्णय देतांना, भाषण करतांना, उभे राहून बोलावे व सभेची मर्यादा राखावी. मतमोजणी-चर्चेचा समारोप होतांच अध्यक्षाने प्रश्न मतास घालावा. अनेक उपसूचना असल्यास त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन मत घेण्याच्या दृष्टीने त्यांचा क्रम ठरवावा, जशा मांडल्या गेल्या त्या क्रमाने मतास टाकल्या पाहिजेत असे नाहीं. सभेतील बहुसंख्याकांच्या मतांचा अंदाज लक्षात घेऊन अनुरूप उपसूचना मतास टाकावी, ती पास अगर नापास झाल्यास अनेक उपसूचना गळून पडतात, अप्रस्तुत ठरतात व यामुळे मतमोजणी थोडक्यांत आटोपते. यासंबंधीचा विस्तारशः विचार पुढील प्रकरणांत केला आहे. सार्वजानेक सभेतील ठरावाला फारशा उपसूचना असत नाहींत, तथापि ज्या सभेपुढे असतील त्यांची वासलात नियमाप्रमाणेच लागली पाहिजे. मुख्य ठराव दुरुस्त झाला असल्यास शेवटी दुरुस्तीसह तो मतास टाकला पाहिजे. त्यावर सभा जे मत देईल तें निर्णयात्मक होय, तें सभेचे मत होय. |प्रश्न मतास टाकीपर्यंत सार्वजनिक सभेत उपसूचना देण्याचा अधिकार आहे; त्याचप्रमाणे मतास टाकणेपूर्वी उपसूचना परत घेण्याचाही हक्क आहे. मात्र उपसूचना परत घेण्यास सभेची परवानगी लागते. सूचना, उपसूचना अगर ठराव एकदां रीतसर सभेपुढे आल्यानंतर मांडणाराला तो परत घेण्याचा हक्क सभेच्या परवानगीशिवाय नाहीं. पुष्कळ वेळां प्रश्न मतास टाकणेपूर्वी अध्यक्ष अगर अन्य सभासद एकमत होण्याचे दृष्टीने कांहीं तडजोड होण्यासाठी प्रयत्न करून बघतात, तडजोड होऊन जे ठरेल त्याला अनुसरून असणारी उपसूचना मांडण्यास अध्यक्षाने परवानगी द्यावी, त्यावर भाषण अगर चर्चा होऊ देऊ नये, तडजोडीची उपसूचना येतांच अन्य सान्या उपसूचना परत घेतल्या जातात अगर ती पास होतांच त्या गळतात. तडजोडी सूचनासुद्धा नियमाला धरून पाहिजेत, म्हणजे ती प्रस्तुत, जाहीर विषयाला घरून, व चर्चेत जे झाले असेल त्याला अनुसरून असली पाहिजे. तडजोडीसाठीं अगर उपसूचना परत घेण्याच्या खटपटीसाठी अध्यक्षाने वेळ दिलाच पाहिजे असा निबंध त्यावर नाहीं. सभेचे एकमत होणे इष्ट आहे ऐवढी दृष्टि ठेवून त्याने वागावें ही रास्त अपेक्षा आहे. पुष्कळ वेळां केवळ वावदूकबुद्धीने, प्रसिद्धीचे बुद्धीने, प्रचाराचे साधन 2हणून उपसूचना मांडल्या जातात, व मांडणारांना त्या परत घ्या म्हणून