पान:सभाशास्त्र.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ सार्वजनिक सभातंत्र

यांची भाषणे पुरी होतांच अगर चर्चाबंदीची सूचना पास होतांच अध्यक्षाने मूळ ठराव मांडणारास उत्तर देणेस सांगावे. | उत्तर देणे याचा अर्थ चर्चेत कांहीं नवीन मुद्दे उपस्थित झाले असतील, कांहीं चुकीची विधाने केली गेली असतील, अगर अन्य सूचना केल्या गेल्या असतील त्यांचा फक्त परामर्ष घेणे हा आहे. उत्तराचे भाषणांत पुनरुक्ति करणे अगर चर्चेत न निघालेले पूर्वीच्या भाषणांत न उल्लेखिलेले असे कहीं सांगणें हें गैर आहे. पुनरुक्ति अनावश्यक व नवीनच कांहीं सांगणें हें अन्याय्य आहे. कारण नवीन जे सांगितले जाईल, नवीन मुद्दे जे प्रतिपादिले जातील त्यांवर चर्चा होऊ शकत नाहीं. अध्यक्षाने नवीन मुद्दे व पुनरुक्ति या दोहोंचेही नियंत्रण करून सभेला न्याय दिला पाहिजे, उत्तर देण्याजोगें चर्चेत कांहीं निष्पन्न झाले नसेल तर, अगर उत्तर देण्याची इच्छा नसेल तर, उत्तर देण्यांत कालक्षेप करणे इष्ट नाहीं. उत्तरादाखल म्हणून झालेले भाषण संपतांच अध्यक्षाने चर्चित विषयाचा समारोप करावा. मुख्य ठराव व त्यावरील उपसूचना या सर्वांचा थोडक्यांत ऊहापोह करून कोणती उपसूचना पास झाल्यास ठरावाचे काय स्वरूप होईल हे स्पष्ट करावें, निरानराळ्या दृष्टिकोनांतून मांडलेले विचार यांचा सारांश सांगून विषयाचे समतोल बुद्धीने थोडक्यांत निरीक्षण करून आपला आभप्राय त्यांतून प्रकट होईल अशी भाषणाची योजना असावी. प्रसंग अध्यक्षाने आपला अभिप्राय स्पष्ट करणे जरूर असते. पुष्कळ वेळां श्रोतृवृंदाकडून त्याबद्दल मागणी येते. अध्यक्षपदानें प्राप्त झालेल्या प्रतिष्ठेचा उपयोग करून सभेच्या मतावर दाब टाकणे इष्ट नाहीं. आपल्या विचारसरणीने समारोपाच्या मांडणीने दोन्ही बाजूंना सारखे वागवून श्रेष्ठ मार्ग, हिताचा मार्ग कोणता हे सभेला चतुर अध्यक्ष दाखवू शकतो. सभेचा नियंत्रक में अध्यक्षाचे मुख्य स्वरूप आहे. मार्गदर्शन में सभेतील नेत्यांचे कार्य आहे. अध्यक्षाने स्वतःचे मत जरी सांगितले, व ते सांगण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे, तरी तें सांगतांना केले जाणारे भाषण प्रचारात्मक असू नये. कारण अध्यक्षाच्या भाषणावर चर्चा नसते. त्याचा कोटिक्रम चुकीचा आहे अगर गैर आहे हैं। दाखविण्यास संधि नसते. अध्यक्षानेही सभेवर अन्याय करू नये, अध्यक्षाने भाषणाच्या सर्व मर्यादा व सभेचे सर्व नियम व संकेत दक्षतेने पाळले पाहिजेत.