पान:सभाशास्त्र.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ५६ •raa

मतदान, लोकशाही राज्यव्यवस्था यांनी वक्तृत्वाला अधिकाधिक कार्यक्षेत्रेच निर्माण केली आहेत. “मुख्य मनोगत राखणें । हेंचि चातुर्याची लक्षणें ॥' या दृष्टीने सभेचे मनोगत वळवणे व मिळवणे हैं भाषणाचे साध्य आहे व ते चातुर्याने साधले पाहिजे. प्रासंगिक, प्रमाणबद्ध, प्रसादयुक्त व सभाधीट भाषण हे चातुर्ययुक्त भाषण होय. वक्ता सभाधीट नसेल तर सर्व व्यर्य आहे. सभेमध्ये लाजणारा व चार मंडळींत वृहस्पतीसारखा बोलणारा इसम सभेच्या दृष्टीने निरुपयोगी आहे. अभ्यासाने, अनुभवाने, मनुष्य सभाधीट होतो. बोलण्यास उभे राहतांच मनात घोटन ठेविलेले विचार उडून जातात, पाठ केलेले आठवत नाही. मनुष्य असंबद्ध बोलू लागतो. तथापि हे सर्व प्रयत्नाने व अभ्यासाने जाते. टिपणे जवळ ठेवावीत. सुरवातीस मोठी भूमिका घेऊ नये. अध्यक्षाचे आभार मानण्याच्या कामांत सुरवात करून लोकप्रिय अध्यक्ष होऊन समतोल समारोप करणारी भूमिका मिळविण्याची आकांक्षा ठेवावी. अल्पारंभ येथेही क्षेमकरच असतो. विद्वत्तेचा आव आणणारे, अधिकारयुक्त वाणीने नटलेले वक्तृत्व अधिकार व अनुभव प्राप्त झाल्याशिवाय करू नये. एखादी शंका अगर प्रश्न विचारतांच अननुभवी वक्ता सर्द होतो व गोंधळतो; त्याला खाली बसावें लागते. प्रश्न-उपप्रश्न विचारले जात आहेत, विरोध होत आहे, शांत चित्ताने प्रसंगावधान ठेवून हजरजबाबी उत्तरे दिली जात आहेत; तथापि भाषणाचे मुख्य सूत्र कायम ठेविले जात आहे हे सभाधीटपणाचे लक्षण आहे. सभाधीटपणा म्हणजे न भितां, हातपाय न लटपटू देतां, न अडतां बोलणे हाच केवळ अर्थ नव्हे; तर चित्ताची स्थिरता, जे ठरले आहे ते बोलण्याचा दृढ निश्चय व न बावरतां, विरोधाला तोंड देऊन, आपली प्रगति चालू ठेवून मुख्य सूत्र कायम ठेवण्याचा संकल्प हा होय. मनाचे श्रेष्ठ धारिष्ट असल्याशिवाय सभाधीटपणा येणे कठीण आहे; व श्रेष्ठ धारिष्ट तळमळीशिवाय, श्रद्धेशिवाय असाध्य आहे. जें अंतःकरणापासून निघतें तें श्रेष्ठ वक्तृत्व अशी व्याख्या केल्यास ती अयथार्थ नाहीं. वायफळ हातवारे अगर अभिनययुक्त भाषण हें वक्तृत्व नव्हे. नटाची स्मृति, वकिलाचे अगर वावदुकाचे जिव्हाचापल्य यांनी वक्तृत्वाला मदत होईल, पण निष्ठावंताची तळमळ व निःस्पृहाचे धैर्य यांनी त्याला पूर्णता येते. त्यांनी ते सफल होते, चर्चेचा समारोप–नियोजित काल संपतांच अगर नियोजित वक्ते