पान:सभाशास्त्र.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५५ सार्वजनिक सभातंत्र केलें एवढ्याने काव्यप्रसव होत नाही. आदिकवि वाल्मिकीनंतर हे दिव्य कोणालाही साधलें नाहीं. म्हणून उत्कृष्ट विचार, मार्मिक कोटिक्रम मनांत आला तरी त्याला योग्य रीतीने व योग्य भाषेत सजविला पाहिजे व हे सर्व अभ्यासाने होणारे आहे. पूर्वीचे अनुभव, विद्यमान नामवंत वक्ते यांचे निरीक्षण, सतत मनन, या योगें सामान्य मनुष्यालाही वक्तृत्वकला संपादन करतां येईल. सभेमध्ये लिहून आणलेले वाचणे परिणामकारक होत नाहीं. विधिमंडळांतून तर लिहून काढलेले भाषण वाचणे मना आहे. चर्चा म्हणजे जिवंत व वाहता प्रवाह आहे. म्हणून त्यांतील उत्पन्न होणारे प्रसंग आगाऊ पूर्णपणे कल्पितां येणे अशक्य असते. एका वाक्य, एकादा कोटिक्रम, तीव्र विरोधाचा आविष्कार अगर अन्य घटना, चर्चेला अकल्पित वळण लावते; आणि मग लिहून आणलेले भाषण अप्रस्तुत व अर्थशून्यही होते. भाषणाने श्रोतृवृंदाशीं समरस होऊन वाटणारा उत्साह, त्यांच्यापासून मिळणारी स्फूर्ति, त्यांच्याकडे पाहून नजरेस नजर भिडवून उत्पन्न होणारे आत्मीयत्व, मनोमनता, हीं सर्व भाषण वाचल्याने लाभत नाहींत. नदीवर दोन्ही तटांवर खांब लावून त्यांवर टाकलेल्या तारेला दोर बांधून चालणारी नावे म्हणजे लेवी भाषण होय; ठरलेल्या मार्गाने ते होणार, उलट हातांत वल्ही घेऊन, उसळणाच्या लाटांना डौलानें तोडत, त्यांची गति घेऊन, दिशा कायम राखत वर आलेल्या खडकांना वळसा घालीत लपलेल्यांना अंदाजून टाळत, गरगर फिरणाच्या भोव-यांना वांचवीत, अगर धैर्याने व निश्चयानें भेदीत जाणारी नौका चालवणे म्हणजे तोंडी वक्तृत्व होय, वक्त्याच्या धैर्याची कसोटी, प्रासंगिकपणाची परीक्षा, त्याच्या विधायक प्रवृत्तींना आव्हान, त्याच्या चातुर्याचे प्रदर्शन, सभेत होत असते. हे सर्व प्रसंग लेखी भाषणाने टळतात, गुणविकासाला ते मारक ठरते. लिहून काढणे, टिपणे करणे, उतारे हाताशी ठेवणे, हे सर्व योग्य आहे. पण भाषण असे तोंडीच झाले पाहिजे. वक्त्याच्या दृष्टीने प्रभावी व सभेच्या दृष्टीने ते परिणामकारक ठरते. मुद्रणकलेच्या प्रसारानें ग्रंथनिर्मिति अगर लिखित वाङ्मय किती जरी वाढले, तरी श्रवणांतील स्फूर्ति व त्याने होणारा जिवंत परिणाम हो कमी झाला नाहीं. उच्चारलेल्या शब्दांचे सामर्थ्य यत्किचितही कमी झालेले नाही. उलट दूरध्वनिक्षेपक, रेडिओ वगैरे साधनांनी शेकड्यांनी मिळणारा तसमाज, हजारोंनी-लाखांनी मिळू लागला आहे. शास्त्रांची प्रगति वक्तृत्वकलेला मारक न ठरतां पोषकच झाली आहे. सार्वत्रिक शिक्षण, सार्वत्रिक