पान:सभाशास्त्र.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ५४


निर्णय योग्य असल्यास वक्त्याने मान्य केल्याने त्याची चूक लोक विसरून जातात; अध्यक्षाचा निर्णय अयोग्य असल्यास वक्त्याने तो मानल्यास त्याचा परिणाम वक्त्याच्याच बाजूने दृढतर होतो, सभेचे स्थान, सभारचना व उपस्थित श्रोतृवंद या गोष्टी लक्षात घेऊन आवाजाचे नियमन करावे. भाषणांतील विचार व भावना यांना अनुरूप राहील असा आरोह व अवरोह आवाजांत असावा. अस्खलित भाषण म्हणजे एका आवाजांत भाषण असा अर्थ नव्हे, श्रोत्यांकडे पाहून त्यांच्या मनावर होणारा परिणाम त्यांच्या हावभावांवरून, डोळ्यांवरून हेरून, भाषणाची गति कमी जास्त करावी. भाषण पटले पाहिजे. बोललेले सहज आकलन होईल इतक्या गतीने बोलले पाहिजे, विचार, कोटिक्रम मनांत उतरून, अनुभवाला पटून हास्य, टाळ्या अगर अन्य हावभावांनी श्रोत्यांनी मान्यता दर्शविली तर त्याचा उपयोग, श्रोतृवंदांतील बहुसंख्याक लोक जी भाषा सहज समजतील अशी भाषा असावी. अन्लील, अचकटविचकट भाषा, म्हणजे जनतेची भाषा ही खोटी कल्पना आहे. बाजारांत चार माणसे जमलीं असतां जी भाषा बोलली जाते ती जनतेची भाषा. तिचा मुख्य गुण म्हणजे ती सहज समजते, किंबहुना समजावी म्हणून बोलली जाते. ज्ञानाचा पुरावा क्लिष्ट अगर दुर्बोध भाषा मानणे हा पंडितांचा अहंकार आहे. सार्वजनिक सभा ही पांडित्यप्रदर्शनाची जागा नाहीं. लोकांना पटवून त्यांचे मन वळवावयाचे आहे या स्थितीत त्यांना आकलन होणार नाहीं असले गहन विचार, समजणार नाहीत असले कोटिक्रम, अगर ऐकताच अर्थ सहज लक्षात येणार नाहीं असली भाषा वापरणे, विफल ठरते. लहान शब्दांत मोठा आशय, व थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ असू शकतो. भाषण म्हणजे पाणिनीची सूत्रे नव्हत, पण त्याचबरोबर लांबलचक असंबद्ध पुराणही नव्हे. भाषणांत पोषाकाप्रमाणे प्रमाणबद्धता पाहिजे. नटवेपणा नसावा, पण यथार्थ उपमा, मार्मिक कोटिक्रम यांनी ते आकर्षक असावें. | प्रासंगिक, प्रमाणबद्ध, प्रसादयुक्त भाषण ही प्रयत्नसाध्य गोष्ट आहे. होतकरू वक्त्यांनी आपले भाषण घरीं लिहून काढावें, लिहिलेले बाजूस ठेवून ते एकांत बोलण्याचा सराव करावा. ज्यांनी वक्तृत्वकलेंत नांव मिळविले आहे त्यांनी प्रयत्नांन–अभ्यासाने ही कला साध्य केली आहे. कवीला स्फूर्ति प्रसंगाने, एखाद्या नाट्य अगर रम्य घटनेने उत्पन्न झाली तरी, वृत्तशास्त्र, व्याकरण वगैरेची माहिती असावी लागते. मनांत आले व वाचेने उद्घोषित