पान:सभाशास्त्र.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५३ सार्वजनिक सभातंत्र •= पडेल अशी खोटी कल्पना प्रसंगाबाबत अगर विषयाबाबत द्यावी असा याचा अर्थ नाहीं. श्रोत्यांचा स्वाभिमान न दुखवतां आप्त वाक्य म्हणजे जें यथार्थ असेल ते सांगावे. ज्याच्याजवळ बोलण्यासारखे काही आहे त्यानेच बोलणे श्रेयस्कर ठरते. विषयाची व कालाची मर्यादा संभाळून बोलावे, जी भूमिका असेल तिला अनुसरून भाषण असावे. ठराव मांडावयाचा असेल, अनुमोदन द्यावयाचे असेल, विरोध करावयाचा असेल, कायद्याच्या मुद्द्यावर बोलावयाचे असेल, उपसूचना किंवा तहकुबीची सूचना यांवर बोलावयाचे असेल, तर विषयाची व कालाची मर्यादा संभाळली पाहिजे. अध्यक्षाचे आभार मानतांना पास झालेल्या ठरावाचे विवरण सर्वस्वी अप्रस्तुत व मुखशुद्धीसाठी पुन्हा मुख्य पक्वान्न आणण्यासारखे आहे. वीट येणे अगदीं साहजिक असते, श्रोते अधीर झाल्यास त्यांस दोष देता येणार नाहीं, व वक्त्याने वेळ मनांत घेऊन आपल्या भाषणाची योजना आखावी. प्रास्ताविक प्रथम पण आकर्षक रीतीने सांगून मुख्य विषयाचे विवरण करून, शेवट चटकदारपणे करावा. वक्ता आणखी बोलला तर हवे आहे असे श्रोत्यांना वाटण्यांत त्याचा गौरव आहे. 'वन्समोर होत असतांनाच नटाने पडद्यांत जावें, गंडोच्या खाण्यापर्यंत वेळ येऊ देऊ नये, हे जसे शहाणपणाचे तसेच अकारण टाळ्या सुरू होतांच वक्त्याने भाषण संपवावे. लोक कांहीं काळ ऐकून घेऊन टाळ्या पिटू लागले तर त्यांना दोष देता येणार नाहीं, लोकांना अप्रिय वाटणारे भाषण सुद्धां चातुर्याने केल्याने लोक ऐकून घेतात. अजीबात भाषणच होऊ न देणे हा वक्त्यावर अन्याय आहे, व त्यांत सभेची प्रतिष्ठा नाही. त्याजबरोबर वाटेल ते व वाटेल तितकें वक्त्याने बोलावें व सभेने ते ऐकावे असे सांगणें हें सभेवर अन्याय करण्यासारखे आहे. सभा ही वक्तृत्वाची शाळा नव्हे, परीक्षामंडप आहे हे वक्त्याने विसरू नये. तेच ते विचार, तेच ते कोटिक्रम पुनः पुन्हा ऐकण्यास लोक कंटाळतात. नाटकांतील अंकाप्रमाणे सभाकायचा विकास होत जावा, त्यांत गति राहावी व मतमोजणीच्या वेळी तल्लीनतेचा उच्चबिंदु निर्माण व्हावा असे सभासंचालन असावे व तसे करण्यांत वक्त्यांनी आपापली भूमिका संभाळून हा प्रकर्ष, हा परिणाम, घडवून आणावा. उभे राहून बोलावें, अध्यक्षाचे ऐकावे यांत लौकिक वाढतो, कमी होत नाहीं. शब्द अगर विधान परत घेण्यास सांगितल्यास घ्यावेत. अध्यक्षाचा