पान:सभाशास्त्र.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ५२ في التنمي مع ام عمى عن مع

असाही अनुभव आहे. इष्टमित्र व चाहते यांच्याकडून होणारा सत्कार जाहीर रीतीने झाला तरी त्याचे स्वरूप यथार्थतः सार्वजनिक नाहीं. सभा भरवून, ठराव करून, सत्कार करावयाचा तर मतभेद प्रगट करणे नियमाला व प्रसंगाला धरून आहे. | प्रसंगानुरूप वक्तृत्व, आक्रमक, संरक्षक, विवेचक, भावनोद्दीपक, वर्णनात्मक, उत्साहक असावे, ‘वचने वावगीं वदेना। वावरे विवरं वसेना । वक्तृत्वे निववी जनां। विनीत होऊन ॥ हें मुख्य सूत्र आहे. असभ्य बोलू नये, असत्य बोलू नये, विवेकहीन बोलू नये, जनमनांत विनीत भावाने प्रवेश करून ते हस्तगत करावे यांत वक्तृत्वाचें सारसर्वस्व आहे. ते प्रासंगिक, अर्थपूर्ण, साध्य साधक असावे, अनुरूप विचार अनुरूप भाषेत सांगितल्याने वक्तृत्वाला श्रेष्ठता येते, ते प्रभावी ठरते. ज्ञान हा वक्तृत्वाचा पाया आहे. वक्तृत्व में कांहीं सर्वस्वी ‘देणे ईश्वराचे' असे नाहीं. अभ्यासाने, प्रयत्नाने, ही कला संपादन करतो येते. विषयाची माहिती, त्याचे जास्तीत जास्त ज्ञान, हे प्रयत्नाचें व अभ्यासाचे फळ आहे. श्रोते हे सर्वसामान्यपणे सहानुभूतीने वागतात. चर्चित विषयाचा दास म्हणविणारा इसम वेडावांकुडा गायिला तरी श्रोते त्याचे ऐकतात. त्यांच्या ज्ञानांत त्यांच्या अनुभवांत खरोखर भर टाकणारे असे काही विचार वेड्यावाकड्या भाषेत जरी मांडले तरी श्रोते तत्परतेने ते ऐकून घेतात. वक्तृत्वाची किंमत सहृदय श्रोते कळकळीचे मापाने करतात. उलट वावदूक वक्ता; भाडोत्री वक्ता, अस्खलित बोलला तरी त्यांच्या मनावर त्याचे भाषण परिणाम करू शकत नाहीं. भाषणाची पूर्वतयारी केल्याशिवाय, त्यासंबंध पूर्वविचार केल्याशिवाय बोलू नये. खिशांत पैसे असल्याशिवाय सौदा करू नये इतकें ते महत्त्वाचे आहे. केवळ लौकिक अगर लोकप्रियता यांवर वारंवार भरंवसा ठेवून व्यासपीठावर येऊन व्याख्यान ‘बडवणे' हा हातचा मळ वाटत असला तरी, त्या योगे वक्त्याची वैचारिक प्रगति कमी होते व लोकप्रियताही कमी होते, नियुक्त असो नसो, प्रत्येक वेळी प्रत्येक विषयावर उभे राहून कांहीं तरी बोलणे याने वक्त्याच्या लौकिकांत भर पडत नाही. काही तरी चांगलं बोलण्यासारखे असले पाहिजे व चांगल्या रीतीने ते बोलता आले पाहिजे. असे असेल तर बोलावे हा श्रेष्ठ धर्म आहे. वक्तृत्वाचा उद्देश अगर साध्य श्रोत्यांचे मन प्रसन्न करून वळवावयाचे आहे हे त्याने विसरू नये. श्रोत्यांनी शंका घेतली म्हणून भांडू नये. त्यांचा वीट मानू नये. त्यांची खुशामत करावी, त्यांना पसंत