पान:सभाशास्त्र.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५? सार्वजनिक सभातंत्र

असले पाहिजेत, त्यांच्या सामुदायिक प्रवृत्तींशी त्याचा चांगला परिचय असला पाहिजे, वक्याचे म्हणण्याप्रमाणे करण्यांत आपले हित आहे व नं करण्यांत धोका आहे असा तीव्र भाव त्यांच्यांत उत्पन्न करावा लागतो. | शोक-सभा असेल तर मृतासंबंधी टीका करणे अनुचित असते. मृताचे गुणगान करण्यांत अतिशयोक्ति साहजिक होते. मृताचे जीवनकार्यासंबंध मतभेद असूनही मतैक्याचे बाबतींतच बोलून अप्रिय टीका टाळण्याने काहीं बिघडत नाहीं. शोकसभेत वादविवाद उत्पन्न व्हावा, कडवटपणा उत्पन्न व्हावा, मृताचे आप्त, मित्र व पक्षपाती यांना लागेल, त्यांना दुःख होईल असे भाषणांत येणे हे इष्ट नाही. त्यासाठी अन्य प्रसंग असतात. मृताचे पक्षपाती यांनीही शोकसभा आणि विशेषतः ती सर्वपक्षीय व सर्वांनीं भाग घ्यावा या उद्देशाने ठेवली असेल तर अतिशयोक्ति टाळावी व शोकसभेला पक्षप्रचाराच्या सभेचे स्वरूप देऊ नये. प्रचाराचे दृष्टीने मृत्यूचा उपयोग करावयाचा असेल तर सभा न करता मार्क अॅन्टोनीप्रमाणे जमलेल्या लोकांना वक्तृत्वाने प्रक्षोभित करणे अगर उत्तेजित करणे अयोग्य नाहीं. - शोकसभेच्या मर्यादा सत्कारसभेला लागू नाहींत. सार्वजनिक सभेत ठराव होऊन सत्कार व्हावयाचा असेल तर, ज्याला तो पसंत नसेल त्याला विरोध करण्याचा हक्क आहे येवढेच नव्हे तर विरोध करण्यांत औचित्यभंग अगर अप्रासंगिकता येतेच असे नाही. ज्याचा सत्कार होतो तो त्याच्या कार्याचा असतो. त्याचे कार्य सार्वजनिक असल्यामुळे त्या कार्याची योग्यता सर्वांच्या दृष्टीने सारखी असणार नाही. किंबहुना ते सर्वस्वी समाजहितविरोधी आहे असेही मत कांहींचे असू शकेल, सत्काराला सार्वजनिक स्वरूप हवे असेल तर संभाव्य विरोधाला तयारी ठेवली पाहिजे. सार्वजनिक व्यक्तीचा सत्कार हा व्यक्तिविषयक गुणांचा सत्कार असे त्याला मिळमिळीत स्वरूप वस्तुतः असत नाहीं. त्याचे कार्याचा सुगंध त्याचे जीवनांतूनच उत्पन्न झालेला असतो. एखाद्याचे कार्य धर्मनिष्ठा दाखविणारे असेल, पण ते राष्ट्रीयत्वाचे दृष्टीने कोणाला पसंत नसेल; एखाद्याचे कार्य समाजांत समता उत्पन्न करणारे, दलितांचा उद्धार करणारे असेल, पण धर्मदृष्टंया ते कोणाला पसंत नसेल, म्हणून सार्वजनिक सत्कारप्रसंगी मतभेद दर्शविणे गैर नाहीं. असल्या प्रसंगी मतभेद मांडण्याचा हक्क आहे, याचा अर्थ तो मांडण्यांत सौजन्य, सहिष्णुता अगर सद्भावना सोडलीच पाहिजे असा नाहीं. किंबहुना विरोधाच्या ‘मिठाने सत्काराच्या पक्वान्नास थोडी चवच येते