पान:सभाशास्त्र.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ५ 0 ते योग्य तन्हेने साधक-बाधक चर्चा होऊन दिले जावे हे पाहण्याचे त्याचेही कर्तव्य आहे. शिस्तवार, नियमानुसार विरोध करण्याचा प्रत्येक सभासदाला अधिकार आहे. त्याचबरोबर बेशिस्त वागणारा 'अगर सभाकायत जाणूनबुजून अडथळा उत्पन्न करणारा सभासद् अगर त्याचा गट हा संभाविद्रोही आहे. मूठभर लोकांनी अगर एखाद्या आडमुठ्या सभासदाने सभाकायत विच्च उत्पन्न करून ती बंद पाडावी हा अन्य सभासदांवर जुलूस आहे. अशा विरोधकांना सभेतून जरूर तर शक्तीचा उपयोग करून बाहेर काढणे न्याय्य आहे. बेशिस्त विरोधाने, असलेला सहानुभूति जाते व नियमानुसार, शिस्तवार, दृढनिश्चयी विरोधाने नसलेली मिळू लागते हा अनुभव आहे. सभावक्तृत्वः- सभेतील शांतता, सभेतील व्यवस्था ही सर्व तींत होणाच्या चर्चेला अनुकूल वातावरण उत्पन्न करण्यासाठी आहेत. सभेतील मुख्य भाग म्हणजे चर्चा व वादविवाद. भाषणाच्या मर्यादा व अध्यक्षानें तद्विघयक करावयाचे नियमन यांचा उल्लेख पूर्वीच केला आहे. चर्चा अगर वादविवाद हीं स्वरूपतः एकच आहेत. वादविवाद म्हणजे ज्यांत औपचारिकपणा जास्त आहे अशी चर्चा असे म्हणण्याचा प्रघात आहे. (A more formal discussion is debate.) तथापि वक्तृत्वाच्या ऐन गुणांचे दृष्टीने हा फरक विशेष महत्त्वाचा नाहीं. वक्तृत्वाचा सांगोपांग विचार येथे करणे हैं। अप्रस्तुत नाही; पण ग्रंथाची मर्यादा व मुख्य हेतु लक्षात घेतां ते अशक्य आहे. रंगभूमीची चर्चा करतांना अभिनयाला जें स्थान आहे, तेच येथे वक्तृत्वाला आहे. सभेतील वक्तृत्व में सभेचे स्वरूपाला व हेतूला अनुसरून असावें. तपशीलवार, कलमवार चर्चा करतांना लागणारे वक्तृत्व में सर्वसामान्य सिद्धांतांवर बोलतांना लागणाच्या वक्तृत्वाहून भिन्न असते. तपशीलवार चर्चा करतांना विषयाचें अधिक ज्ञान अवश्य आहे. तेथे भावनावश भाषण करणें निरुपयोगी ठरते. पृथक्करण करून, उदाहरणे देऊन, अनुभव सांगून, तुलना करून वक्त्याने श्रोतृवृंदाची बुद्धिवादाने खात्री करावयाची असते. त्यांच्या विचारांना चालना देऊन आपले बाजूस त्यांना वळवावयाचे असते, वक्त्याला आपलं म्हणणे सयुक्तिक आहे, बुद्धीला पटणारे आहे, विवेकपूर्ण आहे, असा भाव त्यांचे मनांत उत्पन्न करावयाचा असतो, जेथे वादविवाद केवळ सामान्य सिद्धान्त 'बाबत आहे, तेथे बुद्धिवादापेक्षा भावनांना आळवून, सभा अगर फड मारून न्यावयाचा असतो. वक्त्याला तेथे श्रोतृवंदाचे पूर्वग्रह चांगले माहीत