पान:सभाशास्त्र.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४९ सार्वजनिक सभातंत्र •••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

बोलत असतांना त्याला वारंवार प्रश्न विचारून खंडू नये. त्याचे भाषणावर घांवती टीका नसावी, म्हणजे त्याने वाक्य उच्चारावे व लागलीच त्यावर टीका व्हावी असे होऊ नये. सभा म्हणजे द्वंद्वगीत नव्हे. विनोदी, कोटिबाज, विरोधदर्शक एखादा शब्द अगर वाक्य उच्चारणे गैर नसून उलट सभेतील वातावरण चांगले ठेवण्यास ते मदतच करते. कांहीं बेजबाबदार ओरडून वातावरण बिघडते येवढेच नव्हे तर सभेचा विपर्यास होतो. पुण्यातील एका प्रसिद्ध व्यक्तीचे निधनानिमित्त भरलेल्या शोकसभेत अध्यक्षाचे समारोपाचे वेळी एका माननीय सभासदाने अकारण व अप्रस्तुत प्रश्न विचारून अध्यक्षाला चिडविले व तेथपर्यंत शांत व गंभीर वातावरणांत चाललेली सभा विसकटली व निराळ्याच अर्थाने शोकसभा ठरली. | समाचालकांवर सभेतील व्यवस्थेची जबाबदारी आहे हे लक्षात ठेवून ते सांगतील तेथे सभासदांनी बसले पाहिजे, शांतता व व्यवस्था राखण्याचे काम सभासदांनी आपआपल्या परीने मदत केली पाहिजे, ठरविलेल्या मार्गाने यावें व जावें. सभा चालू असतां जाणे झाल्यास शांतपणे जावें. अध्यक्षांपुढून अगर बोलणाच्या वक्त्यापुढून जावयाचा मार्ग असेल तर वांकून जावें, जातांना हस्तपत्रकें फेकून अगर बैठकीची मोडतोड करून अगर नासधूस करून जाऊं नये. समाचालकांनी ज्ञानदानाची, मनोरंजनाची, मतप्रदर्शनाची, जी संधि व जो योग घडवून आणला त्याबद्दल त्यांना तोशीस लागणार नाहीं, येवढी तरी कृतज्ञता प्रत्येक श्रोत्याने मनांत ठेवली पाहिजे. सभेत येतांना व जातांना गर्दी करणे, खेचाखेच करणे, उगीच ओरडणे, सभा संपताच व्यासपीठाकडे धावणे, अगर मुख्य वक्ता अगर अध्यक्ष यांचेकडे स्वाक्षरीसाठी गर्दी करणे, हे टाळणे जरूर आहे. सभेतील स्वयंसेवकांचे ऐकले पाहिजे, तो उर्मट असेल अगर असभ्य वागेल तर सभाचालक अगर अध्यक्ष यांचेकडे तक्रार करावी. त्याच्याशी बाचाबाची केल्याने सभाभंग होतो. अनेकांना निराश करण्यास ते एक अजाणतः कारण ठरते. त्याने शांत राहण्यास सांगितल्यास राग मानण्याचे कारण नाहीं. प्रवेशपत्रिका मागितल्यास अपमान समजण्याचे कारण नाही. खुद्द गांधीजींना काँग्रेस-अधिवेशनांत प्रवेशपत्रिका दाखविण्याचे प्रसंग आले आहेत, सभासदांची सभा आहे म्हणून तिची प्रतिष्ठा राखणे हे प्रत्येक सभासदाचे कर्तव्य आहे. सभेचे मतांत त्याचेही मत असते म्हणून स...४