पान:सभाशास्त्र.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ ससाशास्त्र

आहे त्यांचीच सभा असा निर्णय दिला असता तर सभासदत्व मर्यादित झाले असते, कारण मान्य करणारे तेवढेच हजर राहून भाग घेऊ शकले असते, दोन्ही निर्णय जाहीर निमंत्रणाला धरून होते. अध्यक्षाच्या निर्णयाप्रमाणे ज्याला सभेत भाग घेतां येतो तो सभासद्, व अशा सर्व सभासदांची सामुदायिक उपस्थिति म्हणजे सभा होय. सभासद नसलेले इसम हजर राहूं शकतील पण त्यांना सभेचे कामांत भाग येतां येणार नाहीं. प्रत्येक सभासदाला सभेचे कार्यात भाग घेण्याचा हक्क आहे. अध्यक्ष निवडणे, ठराव मांडणे, उपसूचना देणे, चर्चाबंदीची, तहकुबीची सूचना मांडणे, प्रश्न विचारणे, सभेपुढील चर्चेत भाग घेणे वगैरे गोष्टी करण्याचा त्याला अधिकार आहे. त्याचप्रमाणे जो ठराव सभेचे मतार्थ अध्यक्ष मांडतील त्यावर मत देण्याचा अधिकार आहे. अधिकार आहे म्हणून ठराव दिलाच पाहिजे अगर उपसूचना दिलीच पाहिजे अगर बोललेच पाहिजे असे नाही. तसेच आपण सभेला उपस्थित आहों हे दाखविण्यासाठी मध्येच घोषणा करणे अगर प्रश्न विचारणेही श्रेयस्कर नाहीं. सभाकार्याला मदत करण्याच्या हेतूने योग्य ते करणे हे सभासदाचे कर्तव्य आहे. सभेत भाग घेण्याचे अधिकार सभानियमाप्रमाणे व अध्यक्षाचे नियमनाला अनुसरून सभासदाने वापरले पाहिजेत. सभा म्हणजे ज्या लोकसमूहांत एकावेळीं एकच बोलतो व इतर ऐकतात असे तिचे स्वरूप आहे व असले पाहिजे व ते तसे ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदांवर आहे. म्हणून एकापेक्षा अधिक माणसांनी उभे राहून बोलण्यास सुरुवात करू नये. ज्याचें नांव अध्यक्ष घेतील त्यानेच बोलावे, अध्यक्षाने आज्ञापिलेला वक्ता बोलू लागला की बाकी कोणी उभे राहू नये. वक्ता व श्रोते यांच्यामधून जाऊं येऊं नये, वक्त्यास प्रश्न विचारणे झाल्यास, कायद्याचा मुद्दा उपस्थित करणे झाल्यास, उभे राहून बोलावें. पृच्छक उभा राहील, त्या वेळी वक्त्याने थांबावे व बसावे. अध्यक्ष निर्णयासाठीं अगर नियमनासाठी उभा राहील, त्या वेळी सर्वांनी वसले पाहिजे, शांतता ठेवली पाहिजे, तसेच कोणी वक्ता बोलत असेल तर आपसांत कुजबुजू नये, अगर गप्पामंडळे अगर वर्तुळे सुरू करू नयेत, तसे झाले म्हणजे सभेला बाजाराचे स्वरूप येते. तसेच सभेत कोंडाळ। करून खाणेपिणे करून सभेला उपहारगृहाचे स्वरूप देऊ नये, वक्त्याचे म्हणणे पसंत नसले म्हणून, आरडाओरडा करून ते बंद पाडणें हें गैर आहे. वक्ता