पान:सभाशास्त्र.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ४६ सभेबाबत गैरलागू आहे. तथापि सार्वजनिक सभा, काम न करता तहकूब करतांच येत नाही असे मात्र नाही. सार्वजनिक सभा भरविणे वाटते तेवढे सोपे नसते. मिळालेली जागा दुसच्या प्रसंगाला मिळेलच अशी खात्री नसते. म्हणून सामान्यपणे जाहीर केलेले सभाकार्य पुरे करणे श्रेयस्कर असते. कोणा महान् व्यक्तीचा मृत्यु अगर कांहीं असाधारण व प्रक्षोभक घटना, सभा जाहीर केल्यापासून ती भरेपर्यंत झाली असेल तर, सभा तहकूब करणें कांहीं प्रसंग योग्य ठरते. तथापि सभा तहकूब करण्याचा हक्क सभेचा आहे, अध्यक्षाचा अगर सभाचालकांचा नाही. म्हणून सार्वजनिक सभेपुढे सभातहकुबाची सूचना कायदेशीरपणे कोणालाही आणतां येते. सभाच तहकूब करावी, अगर एखाद्या ठरावावरील चर्चा तहकूब करावी, अगर एखादा ठराव विचारांत घेऊ नये, अशा प्रकारच्या सूचना करून सभाकार्य खंडित करून, सभा तहकूब करणे भाग पाडता येते. तहकुबीची सूचना कोण केली की तिला ताबडतोब मांडण्याची परवानगी अध्यक्षाने दिली पाहिजे, तिजवर थोडक्यांत चर्चा व्हावी व ती मतास घालावी. पास झाल्यास तिचा योग्य तो परिणाम होऊन सभाकार्य खंडित होईल. नापास झाल्यास पुनः मूळ प्रश्नावरील चर्चा सुरू होईल. पुनः पुन्हा तहकुबीची सूचना आणता येते. तथापि निदान, दोहोंत अर्ध्या तासाचे तरी अंतर असावे, असा संकेत आहे. सभातकुन्नी याचा अर्थ नियोजित कार्य अपुरे ठेवणे अगर राहणे हा आहे. सार्वजनिक सभा ही एकाच वेळी भरून एका जुपीने एका बैठकीत नियोजित कार्य पुरी करणारी घटना आहे. सकाळ, संध्याकाळ अगर दररोज भरणारें अधिवेशन अगर संघटित संस्थेच्या दैनंदिन अगर वारंवार भरून व कार्यक्रमपत्रिकेवरील काम पुरे करणाच्या सभा, असे तिचे स्वरूप नसते. सार्वजनिक सभेपुढील कामकाज तपशीलवार स्वरूपाचे नसते. सर्वसाधारण पाठिंबा अगर निषेध असे स्वरूप असल्याने एखादा दुसरा ठरावच कार्यक्रमपत्रिकेत असतो, व एकाच बैठकीत त्याचा निकाल लावणे इष्ट असते. त्या दृष्टीने सभाकाल, वक्त्यांची निवड व नियंत्रण झाले पाहिजे, | सभेची संमति अवश्यः-- ठराविक वेळांत सभेचे कार्य पुरे होत नाहीं असे असेल व जागा वगैरेची सोय पुनः शक्य असेल तर सभा तहकूब करणे श्रेयस्कर आहे. तथापि सभा तहकूब करण्यास सभेची