पान:सभाशास्त्र.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४५ सार्वजनिक सभातंत्र म्हणजे चालू चर्चा थांबते व याच सूचनेवर चर्चा होते. ही सूचना पास झाली तर मूळ प्रश्नाची चालू असलेली चर्चा बंद होते. फक्त ठराव मांडणारास उत्तरादाखल बोलण्याचा अधिकार आहे. त्याचे उत्तर संपतांच प्रश्न मतास टाकला पाहिजे. जर चर्चाबंदीची सूचना नापास झाली तर ती येण्याचे वेळी जो वक्ता बोलत होता त्यास आपले भाषण पुनः सुरू करण्याचा हक्क प्राप्त होतो व पुढे चर्चा चालू राहते. | चर्चाबंदीचे सूचनेने अल्पसंख्याकांवर जसा अन्याय होऊ नये हे अध्यक्षाने पाहणे इष्ट असते तसेच अल्पसंख्याक अगर उगाच बोलणारे तेच तेच मुद्दे, तोच तोच कोटिक्रम सांगून सभेची वेळ व सभासदांच्या सहनशीलतेचा फायदा घेऊ लागले, सभेच्या कामांत जाणून बुजून अडथळा उत्पन्न करू लागले, विनाकारण चर्चा लांबवू लागले, तर या गोष्टी टळाव्यात म्हणून चर्चाबंदी हा एक योग्य मार्ग आहे हेही अध्यक्षाने जाणले पाहिजे, गांजलेले, कंटाळलेले असहाय झालेले सभासद योग्य रीतीने या उपायाचा अवलंब करू लागले तर तो होऊ दिला पाहिजे, अध्यक्षाने त्यांनाही न्याय दिला पाहिजे, अल्पसंख्याकांनाही बहुमतवाल्यांवर अन्याय करण्याचा अधिकार नाहीं, अगर आपल्या विरोधाने सभेचे कार्यात अडथळा उत्पन्न करून सभेला आपला निर्णय देण्यापासून वंचित करण्याचा अधिकार नाही. जमलेली सभा निर्णयासाठी आहे व योग्य चर्चा होतांच निर्णय घडवून आणण्याचे कर्तव्य अध्यक्षाचे आहे व त्या दृष्टीने त्याने चर्चाबंदीकडे पाहावें. सभातहकुबीः--सभातहकुबीचे अनेक प्रकार आहेत. त्यांचा विस्तार विचार पुढील प्रकरणांत करण्यात येईल. सार्वजनिक सभा ही विशिष्ट गोष्टीबाबत कांहीं करण्यासाठी बोलाविलेली असते. म्हणून सभेपुढील काम न करतांच सभा तहकूब करावी अशी सूचना आणणे गैर आहे. विधिमंडळांतून, स्थानिक स्वराज्य संस्थांतून, सभेचे सुरवातीस कार्यक्रमपत्रिकेत नसलेली एखादी निश्चित बाब सार्वजनिक महत्त्वाची व जरुरीची आहे. ( Urgent public importance ) त्याचा विचार व्हावा म्हणून सभातहकुबीची सूचना आणण्यांत येते तिचा उद्देश गा-हाण जगजाहीर करणे, सरकार अगर अधिकारारूढ पक्षावर हल्ला करणे हा असतो. तशी परिस्थिति सार्वजनिक सभेत नसते. तसेच कोणी सभासद मेला अगर अन्य कांहीं असाधारण घटना झाली तर सुरवातीलाच तहकुबीची सूचना आणण्याचा प्रघात आहे तोही सार्वजानिक