पान:सभाशास्त्र.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तभाशास्त्र ४४ लचक भाषण नव्हे किंवा त्याचे नावाखाली पुनः दुसरे भाषण करण्याची संधि नव्हे. वस्तुस्थिति सांगण्याची संघ म्हणजे खुलासा आणि म्हणून तो अगदी थोडक्यांत असला पाहिजे. खुलासे व प्रतिखुलासे फार वेळ चालू दिले तर अनेक अप्रिय गोष्टी घडत जातात, चर्चेत कडवटपणा येतो, सभेतील उच्च व उदात्त वातावरण मलिन होऊ लागते. अध्यक्षाने अवश्य तेवढाच व तेवढ्यांच बाबतींत खुलासा करण्यास परवानगी द्यावी. कामकाजी प्रश्नः-चर्चा चालू असतां कायद्याचा मुद्दा, नियमासंबंधीचा मुद्दा अगर कामकाजी प्रश्न ( Point of order ) कोणाला केव्हाही उपस्थित करता येतो. उभे राहून बोलणाराने 4 कामकाजी प्रश्न आहे असे अध्यक्षास सांगाचे व त्याने परवानगी दिली म्हणजे तो काय व त्याबाबतचे थोडक्यांत विवेचन करावे, या मुद्द्यांवर थोडक्यांत जरूर वाटल्यास इतरांना बोलण्यास सांगून अध्यक्षाने निकाल द्यावा. कामकाजी मुद्दयावर कोणालाही बोलतां येते. अध्यक्षाचा निकाल हा अखेरचा मानला पाहिजे, कामकाजी सुद्दे यासंबंधी अधिक विवेचन पुढील प्रकरणांत केले आहे. । चर्चाबंदीः-अध्यक्षाने सभाकाल किती हे ठरविले असले तरी चर्चा बंद करावी व मते घ्यावीं ' (Closure ) ही सूचना ठराव मांडल्यानंतर केव्हाही कोणाही सभासदाला मांडतां येते. तथापि सभेचा हेतु चर्चा होऊन सभेने निर्णय द्यावा हा असतो म्हणून कांहीं तरी योग्य व पुरेशी चर्चा झाल्याशिवाय या चर्चाबंदीच्या सूचना अध्यक्षाने स्वीकारू नयेत, या सूचनेने अल्पसंख्याकांना मतप्रदर्शनाचा, बोलण्याचा, जो हक्क आहे तो बुडविला जाऊ नये म्हणून, अध्यक्षाने सर्व मतांचे वक्त्यांना बोलण्याची कांहीं तरी संधि मिळाल्याशिवाय ही सूचना स्वीकारू नये. सूचना आली म्हणून ती मांडू देणे व बहुमताने पास झाली म्हणून चर्चा बंद करून मते घेणे यांत कायद्याप्रमाणे अध्यक्षाचे वर्तन दिसले तरी ते न्यायाचे ठरत नाहीं. बहुमताचा दुरुपयोग होऊ नये, जुलूम होऊ नये म्हणून सर्वांच्या योग्य हक्कांचे संरक्षण करण्याचे अध्यक्षाचे पवित्र कर्तव्य, त्याने अप्रियता स्वीकारूनही केले पाहिजे. म्हणून साधारणतः पुरेशी साधकबाधक चर्चा झाली म्हणजे ही सूचना अध्यक्षाने स्वीकारावी व सभेपुढे मांडण्यास परवानगी द्यावी. यावरील भाषणे थोडक्यांत असावीत व तसे नियंत्रण अध्यक्षाने घालावे. चर्चाबंदीचे सूचनेस अनुमोदन अवश्य आहे. ही सूचना अध्यक्षाने स्वीकारली व मांडण्यास परवानगी दिली