पान:सभाशास्त्र.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४३ सार्वजनिक सभातंत्र .ދ.ގތރކމށފހ

. . - -- - उपसूचना यांना धरून असावीत, ती प्रस्तुत व सभ्य असावत, सभेतील शांतता व सभेची प्रतिष्ठा ही राखली जाईल अशा स्वरूपाची ती असावीत. बदनामीकारक अगर गुन्ह्यास उत्तेजन देणारी अगर केवळ व्यक्तिविषयक टीका करणारी ती नसावीत. जो तो आपल्या भाषणाबद्दल कायदेशीर रीतीने जबाबदार आहे हे खरे. तथापि, तो सभेत बोलत आहे म्हणून त्याला सार्वजनिक स्वरूप असते व सार्वजनिक सभेचे कार्य कसे चालावे याचें कांहीं संकेत आहेत त्यांना अनुसरून सर्व कार्य झाले पाहिजे. भाषणाच्या मर्यादाः—सार्वजनिक सभा में खाजगी वैर काढण्याचे साधन होऊ नये, व्यक्तींची बदनामी करण्याची ती चावडी ठरू नये व समाजांतील शांतताभंग करणारी घटना ठरू नये म्हणून सभापतीने वरील दृष्टि ठेवून भाषणांवर नियंत्रण घातले पाहिजे. भाषणस्वातंत्र्याचे हक्काचा उपभोग घेण्याचे साधन सभा में आहे म्हणून, वाटेल तसा उपभोग घेण्याचा हक्क कोणालाही प्राप्त होत नाहीं. सर्वांचे स्वातंत्र्य संरक्षिले जाईल अशाच रीतीनें प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतला पाहिजे, ही स्वातंत्र्याची वास्तविक मर्यादा नसून मान आहे. भाषणाचे कालाबाबत, विशिष्ट शब्दांबाबत अध्यक्ष जो निर्णय देईल तो वक्त्याने मानला पाहिजे. जे वाक्य अगर विधान, अगर शब्द अध्यक्ष असभ्य म्हणून ठरवितील ते बिनशर्त परत घेतले पाहिजेत, असे करण्यांत वक्त्यास कमीपणा नाही, उलट तो सभेचा मान राखत असतो; व स्वतः शिस्तप्रियता दाखवून स्वतःचे सभासदत्व यथार्थ करीत असतो. त्याचबरोबर वक्ता कडक बोलला, अप्रिय पण सत्यकथन केले म्हणून त्यास अध्यक्षाने प्रतिबंध करू नये व्यंजना, कोटिक्रम, विडंबन केले म्हणून, वक्त्यास अडवू नये, विनोद, व्यंजना, विडंबन, उपरोध मार्मिकता, हीं वक्तृत्वाची शोभा व शस्त्रे आहेत व त्यांचा रीतसर उपयोग करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. असभ्य भाषा, असत्य विधान, अप्रस्तुत कथन या त्रिदोषांपासून भाषण अलिप्त असले म्हणजे झालें.. खुलासाः—चर्चेत प्रत्येकास एकदांच भाषण करण्याचा अधिकार आहे. उपसूचना करणारास उत्तर देण्यासाठी म्हणूनही दोनदां बोलण्याचा अधिकार नाहीं. ठराव मांडणारास शेवटीं उत्तर देण्याचा अधिकार आहे. विशिष्ट गोष्टीबाबत गैरसमज झाला असल्यास, चुकीची दुरुस्ती करण्यासाठी, खुलासा करण्यास अध्यक्षाने योग्य प्रसंगी परवानगी द्यावी. परंतु खुलासा म्हणजे लांब