पान:सभाशास्त्र.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ४३ मांडतां येणार नाही असा नियम अगर संकेत सार्वजनिक सभेच्या कामाबाबत नाहीं. तथापि सभेचे काम व्यवस्थित चालावे म्हणून अध्यक्षाने ठराव मांडला गेल्यानंतर कांहीं निश्चित वेळ देऊन तेवढ्या वेळांत उपसूचना मागवाव्यात व हे ठरवितांना सभेची औपचारिक संमति घ्यावी. उपसूचना ही मांडलेल्या ठरावाला अनुरूप व प्रस्तुत असावी, तिचे स्वरूप अभावात्मक (Negative) नसावें. ठरावाला विरोध करून जे कार्य होणार असेल तेच करणारी उपसूचना गैरलागू होय. उपसूचनेसंबंध विस्तारशः विवेचन पुढील प्रकरणांत केले आहे. । उपसूचनेला अनुमोदन पाहिजेच असे नाही. निदान सार्वजनिक सभेत येणा-या उपसूचनेला अनुमोदनाची जरुरी नाहीं. उपसूचना तोंड घेऊं नये ती लेखी घ्यावी व त्यावर जो ती मांडणार असेल त्याची सही असावी. दिलेल्या वेळांत आलेल्या उपसूचना अध्यक्षाने लागू, गैरलागू, कायदेशीर, गैरकायदा वगैरेचा विचार करून ज्या कायदेशीर व लागू असतील तेवढ्याच मांडण्यास परवानगी द्यावी. | जी उपसूचना गैरलागू आहे ती स्वतः अध्यक्षाने वाचावी व ती प्रस्तुत व कायदेशीर कशी हे थोडक्यांत ज्याचा ती उपसूचना असेल त्यास सांगण्यास संधि द्यावी, त्याचे ऐकून आपला निर्णय थोडक्यांत पण कारणे देऊन जाहीर करावा. ती लागू व कायदेशीर असेल तर ती मांडू द्यावी. केवळ प्रथमारंभीं स्वतःस गैरलागू वाटली म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करून ती गैरलागू ठरवू नये. अध्यक्ष निःपक्षपाती व निराभिमानी आहे हा विश्वास सभासदांत असणे यांतच त्याची प्रतिष्ठा व सभेचे यश आहे. उपसूचना कोणत्या लागू किंवा गैरलागू वगैरे बाबतींत अध्यक्षाचा निकाल हा अखेरचा मानला पाहिजे. । चर्चा-नियमनः—योग्य उपसूचना मुक्रर केल्यानंतर प्रथम प्रत्येक उपसूचना मांडण्यास परवानगी द्यावी. म्हणजे उपसूचकाने सभामंचावर यावे व आपली उपसूचना वाचावी व ही मी मांडतो येवढे म्हणून थांबावें. याप्रमाणे सर्व उपसूचना मांडून झाल्यानंतर मुख्य ठराव व या उपसूचना असा सर्व विषय चर्चेला सभेपुढे आहे असे जाहीर करून बोलू इच्छिणारांची यादी करून सभाकाल लक्षात घेऊन, भाषणांवर कालमर्यादा घालावी. क्रम ठरवून, वक्त्यांस नांवाने बोलावून सभामंचावर येण्यास सांगून बोलण्यास परवानगी द्यावी. चर्चेत होणारी भाषणे चर्चाविषयाला म्हणजे ठराव व