पान:सभाशास्त्र.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४१ सार्वजनिक सभातंत्र ހހހވފނގފލވލމ १६ हा ठराव सभेचे पसंतीसाठीं मांडतों” असे म्हणावे व नंतर ठरावाचे विवेचन करावे. अनुमोदनः-ठराव मांडल्यानंतर अध्यक्षाने अनुमोदनार्थ नियुक्त झालेल्या वक्त्यास बोलवावें अगर या ठरावास कोण अनुमोदन देतो म्हणून पृच्छा। करावी व पुढे येणा-यांपैकी एकाला बोलावून त्यास अनुमोदन देण्यास सांगावे. अनुमोदकानें “मी या ठरावास अनुमोदन देतो' असे प्रथम म्हणून नंतर ठरावाचेसंबंध बोलावे. प्रत्येक ठरावाला अनुमोदनाची आवश्यकता आहे. ठरावाला अनुमोदन न मिळेल तर तो ठराव गळतो व त्यावर सभेला चर्चा करता येत नाही. किंबहुना चर्चेसाठीं तो अनुमोदनाभाव येऊच शकत नाहीं. सभेपुढे चर्चेला ठराव येण्यासाठी त्याला अनुमोदन अवश्य आहे. अनुमोदक सभासद असला पाहिजे. * अध्यक्षानें अध्यक्ष या नात्याने सभेपुढे ठराव मांडल्यास त्यास अनुमोदनाची जरुरी नाही. मात्र अध्यक्षानें वादग्रस्त ठराव अध्यक्ष या नात्याने मांडू नयेत हा संकेत आहे व तो इष्ट आहे. अध्यक्षाने अध्यक्षपदावरून ठराव मांडावा व तो नापास व्हावा हे अध्यक्षाचे प्रतिष्ठेस व पदवीस कमीपणा आणणारे आहे. म्हणून ज्यावर एकमत आहे अथवा ज्याबाबत विरोध नाममात्र आहे असे ठराव अध्यक्षाने मांडावेत. ठरावावर चर्चा करतांना अध्यक्षावर टीका करण्याचा प्रसंग या संकेताने टळतो. चर्चाः–ठराव मांडला व योग्य तहेने त्याला अनुमोदन मिळाले म्हणजे ८६ हा ठराव आतां रीतसर सभेपुढे चर्चेसाठी आला आहे यावर ज्याला बोलावयाचे असेल त्याने बोलावे' असे अध्यक्षाने सांगून नियोजित वक्ते असल्यास त्यांना ठरलेल्या क्रमानें, अगर जे बोलू इच्छितात त्यांची यादी करून त्यांत साधकबाधक भिन्नमतप्रदर्शक चर्चा होईल असा वक्त्यांचा क्रम ठरवून, वेळ मुक्रर करून त्याप्रमाणे होईल असे चर्चेचे नियंत्रण करावें. उपसूचनाः—सार्वजनिक सभेपुढील विषय वर सांगितल्याप्रमाणे तात्विक व सर्वसामान्य पाठिंब्यासाठी अगर निषेधासाठी ठेवण्यात येतात. या दृष्टीने उपसूचनेला फारसा वाव नसतो, तथापि ठराव सभेपुढे अनुमोदन मिळून चर्चेला आला म्हणजे त्यांस उपसूचना देण्याचा अधिकार सभासदांना आहे. उपसूचना, ठराव मांडल्यापासून तो मताला टाकीपर्यंत, केव्हाही देण्याचा अधिकार आहे. उपसूचना, पूर्वसूचना अगर आगाऊ नोटीस दिल्याशिवाय,