पान:सभाशास्त्र.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सक्षाशास्त्र ४०

प्रत्येक नागरिकाला भाग घेण्याचा हक्क आहे. तथापि पुष्कळ वेळा अधिकार नसलेले इसम उपस्थित असतात. * ही पुण्यातील नागरिकांची सभा असा ठराव करते कीं,” या भाषेने जे पुण्यांतील नागरिक नाहींत ते सभेला हजर राहूनही भाग घेऊ शकणार नाहींत. * पुण्यातील हिंदु नागरिकांची ही सभा असा ठराव करते की, या भाषेने पुण्यातील हिंदु नसलेला इसम सभाकार्यात भाग घेण्याला अधिकारी ठरत नाही. पुण्यातील नागरिक', * पुण्यातील हिंदु' या व्यक्ति स्पष्ट व निश्चित आहेत. हिंदु सनातन्यांची सभा' येवढाच उल्लेख असेल तर हजर असलेल्या प्रत्येक हिंदूला भाग घेण्याचा अधिकार आहे. कारण, ‘सनातनी हिंदु' अशी व्यक्ति स्पष्ट नाही. तसेच *पुरोगामा', 'राष्ट्रीय' वगैरेबाबतही म्हणता येईल. तात्पर्य, सभेच्या स्वरूपाप्रमाणे हजर असून सभेत भाग घेण्याचा अधिकार असलेल्या इसमानेच ठराव मांडला पाहिजे. किंबहुना कोणाही अधिकार नसलेल्या इसमास सभेत भाग घेता येणार नाहीं; म्हणजे बोलता येणार नाहीं व मत देता येणार नाहीं. ज्याला सभेत भाग घेण्याचा अधिकार आहे तो प्रत्येक इसम सभासद होय. ठराव मांडणेः–अध्यक्षांनी सभाविषयक आक्षेपांचा निर्णय दिल्यानंतर व आपले प्रास्ताविक भाषण संपविल्यानंतर कार्यक्रमपलिकेंत क्रम असेल त्याप्रमाणे बाबी घ्याव्यात; सभाचालकांनी ठराव तयार केले असल्यास ते घ्यावेत. नसेल तर १६ चर्चेसाठीं अमुक विषय सभेपुढे ठेवतों यावर कोणाला कांहीं सूचना करणे असल्यास त्या कराव्यात असे जाहीर करावे. सार्वजनिक सभेत ठराव करण्याचा उद्देश असेल तर सभाचालकांनी निश्चित ठराव तयार करून ते मांडले पाहिजेत, इतस्ततः व असंबद्ध वादविवाद होणे अगर होऊ देणे इष्ट नाहीं. मोघम विषय चर्चेसाठीं न मांडतां निश्चित ठराव मांडणे योग्य असते, म्हणून अध्यक्षाने जाहीर विषयाला अनुसरून आगाऊ ठराव तयार करून ठेवण्यांस सभाचालकांना सांगावें. सभाचालकांना जाहीर विषयाला अनुसरून ठराव तयार करून सभेपुढे विचारार्थ ठेवण्याचा अग्रक्क आहे. समाचालकांनी ठराव तयार केला असल्यास तो प्रथम मांडण्यास अध्यक्षाने परवानगी दिली पाहिजे, सभाचालकांचा ठराव अगर त्याचे अभावी जो सभेतील सभासदांनी सुचविला असेल तो मांडण्यास अध्यक्षाने आज्ञा द्यावी. अध्यक्षाने 'श्रीयुत क्ष हे ठराव मांडतील' असे म्हणून 'क्ष' यांना व्यासपीठावर बोलवावे. ठराव मांडणाराने प्रथम ठराव स्पष्ट व सावकाश वाचावा व