पान:सभाशास्त्र.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३९ सार्वजनिक सभातंत्र ठरावांचे स्वरूपः–साधारणतः सार्वजनिक सभेपुढे एखादा दुसराच विषय असतो व तत्संबंधींचा योग्य तो ठराव असतो. निव्वळ मतप्रदर्शन म्हणजे निरनिराळ्या लोकांनी आपणांस काय वाटते हे जाहीरपणे सांगणे. पण सभेचे मत, अगर नागरिकांचे सार्वजनिक सभेमार्फतचे मत म्हणजे ते ठरावरूपानेच दाखविले जाते व निश्चितपणे स्पष्ट होते. म्हणून एखाद्या विषयावर सभेचे मत प्रदर्शित करावयाचे म्हणजे ठराव मांडून तो पास करूनच. ठरावाचे अभाव सभेचे अमुक मत आहे असे कोणाला सांगता येणार नाहीं. जाहीर निमंत्रणांत सभेचा उद्देश व विषय सांगितलेला असतो त्याला अनुसरून सभाचालक ठराव तयार करून ठेवतात अगर तयार केले जातात. सार्वजनिक सभेत केवळ तात्त्विक पाठिंबा अगर निषेध येवढेच होऊ शकते. तपशीलवार अगर कलमवार चर्चा करण्याचे स्थान सार्वजनिक सभा में नव्हे व ती तिची भूमिकाही नाही. साधारणतः पाठिंब्याचा अगर निषेधाचा ठराव, सदरहू ठराव योग्य अधिकाच्याकडे धाडण्याचा ठराव, व आभारांचा ठराव, याप्रमाणे सभाकार्याचे स्वरूप असते. पुष्कळ वेळां जाहीर निमंत्रणांत विषय मोघम सांगितलेला असतो, 'शारदा बिलाचा निषेध करण्यासाठी सभा भरणार आहे' असा स्पष्ट उल्लेख न देता ** शारदा बिलाचा विचार करण्यासाठीं सभा भरणार आहे, असा मोघम उल्लेख असतो. अशा वेळी पाठिंबा देणारा व निषेध करणारा असे दोन्ही ठराव सभेपुढे येऊ शकतात. जेथे विषय स्पष्ट असेल, हेतु स्पष्ट असेल तेथे त्याला विरोधक ठराव आणतां येणार नाहीं. सभेचे मत स्पष्ट करण्यासाठी ठराव पाहिजे व तो जाहीर निमंत्रणांत दिलेल्या विषयाला अनुसरून व त्याला प्रस्तुत असा असला पाहिजे. “अन्नपरिस्थितीचा विचार करण्यासाठी भरलेल्या सभेत सरकारी धोरणाचा निषेध येऊ शकेल, त्याचबरोबर काय उपाययोजना सरकारने करावी, लोकांनी काय धोरण स्वीकारावे, याबाबतही ठराव येऊ शकतील, जाहीर विषयाला प्रस्तुत व त्याचे कक्षेत काय येते हे ठरविण्याचा अधिकार अध्यक्षाचा आहे. सभेचे मत म्हणजे जाहीर विषयाला अनुसरून दिलेल्या ठरावावरील मत होय. झालेली चर्चा, झालेली भाषणे हीं सभेचे मत होऊ शकत नाहीत, भाग घेण्याचा अधिकारः—सभेचे मतार्थ मांडलेला ठराव जाहीर विषयाला अनुसरून तो असला पाहिजे व ज्याला सभेत भाग घेण्याचा अधिकार आहे, त्याने तो मांडला पाहिजे, सार्वजानिक सभेत हजर असलेल्या