पान:सभाशास्त्र.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ३८ असतां, “ बालविवाह श्रेष्ठ आहेत असे या सभेचे मत आहे,” असा ठराव मांडता येणार नाही. सामाजिक बाबतीत शारदा बिलाने होणारा सरकारी हस्तक्षेप नापसंत असून, बालविवाह नापसंत असणारा वर्ग आहे व केवळ बिलाचा निषेध होणार आहे एवढेच जाहीर झाल्याने, हा वर्ग गैरहजरही। असेल, तसेच खुद्द बालविवाह पसंत असणारेही अनेक गैरहजर असतील, म्हणून जाहीर विषयाशिवाय इतर विषय अगर विसंगत विषय सभेने चर्चिणे अगर तिजपुढे येऊ देणे गैरकायदा आहे. 'आयत्या वेळचा' विषय म्हणून सार्वजनिक सभेत जाहीर विषयाला विसंगत अगर पूर्णपणे पृथक् असलेलाही पण घेता येणार नाही. तसेच किरकोळ विषय' म्हणून कार्यक्रमपत्रिकेवर बाब असली तरी, तिच्यांतून जाहीर विषयाला विसंगत अगर पृथक् असा विषय घेण्याला अधिकार प्राप्त होत नाहीं. चर्चा, काल व क्रमः—सभेचा कार्यक्रम केवळ मतप्रदर्शन असेल तर, अध्यक्षाने, वक्ते पूर्वी ठरलेले नसतील तर, कोण बोलू इच्छितात हे विचारून त्यांची यादी करावी, सभाकाल ठरवून वेळेची वाटणी वक्त्यांत सारखी जरी नसली तरी न्यायतः करावी; म्हणजे भिन्न विचारसरणीच्या प्रमुख वक्त्यांना जादा वेळ द्यावा. सामान्यतः मुख्य वक्त्यांना २० मिनिटे देऊन इतरांना १० पेक्षा अधिक न देतां सर्व सभेचे कार्य २ तासांत संपवावें, सभेची इच्छा जास्त वेळ बसण्याची स्पष्ट असल्यास अधिक वेळ सभा चालवावी. सभेत ठराव पास व्हावयाचा असेल तर अध्यक्षाने सभाकाल निश्चित ठरवून वेळेची वांटणी उभय बाजूच्या वक्त्यांत न्याय्य प्रमाणांत करावी व अमुक वेळी वादविवाद बंद होऊन मतमोजणी होईल हे जाहीर करावे, म्हणजे श्रोतृवंद दक्ष राहतो. असल्या सभेत अध्यक्षाचे मुख्य काम सभेचा निर्णय योग्य रीतीनें व्यक्त करून घ्यावयाचे असते. वादविवादाशिवाय अगर त्यास योग्य संघि दिल्याशिवाय झालेला निर्णय योग्य म्हणता येणार नाहीं. अभिप्राय व्यक्त करणाच्या, मत देणाच्या सभासदांना, विघय सांगोपांग समजून देण्यांत आला पाहिजे. त्यांनी दोन्ही बाजूचे विचार, दृष्टिकोन, कोटिक्रम लक्षात घेऊन, स्वबुद्धि चालवून मत दिले पाहिजे, हात वर केला याचा अर्थ विचार करून तो केला. मत म्हणजे मनन करून दिलेले ते, या दृष्टीने भिन्नभिन्न विचारसरणीच्या वक्त्यांची योजना व क्रम अध्यक्षानें कौशल्याने ठरविल्यास श्रोतृवृंदाला मत बनविण्यास मदत होते.