पान:सभाशास्त्र.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३७ सार्वजनिक सभातंत्र प्राथमिक आक्षेपांचा निर्णयः–अध्यक्ष स्थानापन्न झाल्यानंतर सभेच्या कार्याला खरीखुरी सुरुवात होते. अध्यक्षाने स्थानापन्न झाल्याबरोबर अगर प्रास्ताविक भाषण केल्यानंतर सभेसंबंधीं जे आक्षेप कोणी घेईल त्यांचा निर्णय द्यावा. सार्वजनिक सभेला लिाखत नियम नाहीत; परंतु कांहीं कांहीं सर्वमान्य संकेत, अन्य संघटित संस्थांचे सभासंचालनासंबंधीचे नियम, कांहीं न्यायालयाचे निवाडे हे सर्व लक्षात घेऊन अध्यक्षाने निर्णय द्यावेत व सभासंचालन करावें. गणसंख्या, जाहीर निमंत्रण, सभेचा कायदेशीरपणा, अगर तिचे स्वरूप अथवा प्रवेशहक्क, यासंबंधींचे आक्षेपाबाबत निर्णय दिल्यानंतर कार्यक्रम-पत्रिकेंतील विषय चर्चेला घ्यावेत. कार्यक्रमपत्रिकेतील क्रम सभाचालकांनी योजलेला असतो तो सहसा बदलू नये; व बदलणे झाल्यास सभेची संमति घ्यावी. । वक्त्यांची योजनाः—सभेत बोलणारे वक्ते सभेपूर्वी जाहीर झालेले असल्यास व मतमोजणीचा प्रश्न नसल्यास इतरांना बोलू दिले पाहिजे असा आग्रह सभेला धरता येणार नाही. कोणाची भाषणे ऐकावयास मिळणार हे आगाऊ समजून श्रोतृवृंद आलेला असतो. चर्चा होणार अगर मतप्रदर्शन होणार, मत घेतले जाणार, असे जर सभाकायचे स्वरूप असेल, तर विविध मतांच्या बक्त्यांना वाव मिळणें हें न्याय्य आहे. जर सभा ठराव पास करणार असेल तर, दोन्ही बाजूंची मतें सभेपुढे मांडली जातील अशी व्यवस्था अध्यक्षाने केली पाहिजे. आणि जर नियोजित वक्त्यांत अशी व्यवस्था नसेल तर इतरांना त्या दृष्टीने बोलू दिले पाहिजे. केवळ मतप्रदर्शन आहे, पण ठराव करणेसाठी सभा नाहीं,.या परिस्थितीत इतरांना बोलू दिले पाहिजेच असा आग्रह सभेला धरता येणार नाहीं. तथापि वेळ व सोय असल्यास एखादा दुसरा वक्ता अधिक बोलू दिल्याने बिघडत नाहीं. सभेचा कल पाहून अध्यक्षाने वागणे ठीक असते. ठराव करावयाचा व एकाच बाजूची भाषणे होऊ द्यावयाची, मग ते वक्ते नियोजित असोत, अगर आयत्या वेळी घेतलेले असोत, ही घटना न्यायाविरुद्ध, सभेच्या मूलभूत सिद्धांताविरुद्ध आहे व कायद्याविरुद्धही आहे. विषयाची मर्यादाः- जाहीर केलेल्या विषयाला सोडून अगर त्याला विसंगत असा विषय अगर ठराव अध्यक्षाने सभेपुढे येऊं देता कामा नये. जाहीर विषयाशिवाय अन्य विषय सभेपुढे येणार नाही, या विश्वासावर अनेक लोक सभेला आलेले असतात, त्यांचेवर भलताच विषय सभेपुढे येऊ दिल्याने अन्याय होतो. * शारदा बिलाचा निषेध करण्यासाठी सभा जाहीर झाली