पान:सभाशास्त्र.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ३६ हेतु सभेचे योग्य नियंत्रण होऊन सभाकाय व्यवस्थित रीतीने व्हावे हा आहे व या हेतूला अनुसरून त्याने आपले अधिकार गाजविले पाहिजेत. उपस्थित व्यक्तींनी व्याक्तशः व संघशः नियंत्रणाचे जे अधिकार दिलेले असतात ते न्यायाला व सदसद्विवेकबुद्धीला धरून वापरले जातील याच विश्वासावर दिलेले असतात. सभेचे हेतु सिद्ध होण्यासाठी सामान्यपणे पुढील अधिकार त्यास असतातः (१) सभेत शांतता राखणे व त्यासाठी जरूर ती उपाययोजना करणे; (२) तांतडीचे प्रश्नांचा निकाल देणे; (३) शांततेनें सभा चालविणे अशक्य झाल्यास ती बरखास्त करणे; (४) सभासंचालनासंबंधी निर्णय देणे; (५) सभेपुढील कार्याचा योग्य रीतीनें परामर्ष घेतला जाईल अशी व्यवस्था करणे व ( ६ ) सभेचा निर्णय जाहीर करणे, अध्यक्षाच कर्तव्येंः–(१) सभेचे नियंत्रण करणे, (२) सभाकायत नियमबद्धता व व्यवस्थितपणा आणणे, (३) वादविवादाला योग्य संधि देऊन मतप्रदर्शन व चर्चा घडवून आणणे, (४) अप्रस्तुत चर्चा होऊ न देणे. अध्यक्षाचे अधिकार व कर्तव्ये यांचा विस्तारशः विचार पुढील प्रकरणांत केला आहे. सभामंच (व्यासपीठ ):–सभामंच म्हणजे सभेतील विशिष्ट जागा, की ज्या ठिकाणी अध्यक्ष बसतो व जेथून सभेचे नियंत्रण करतो, सर्व सभा अध्यक्षाचे नजरेत यावी या दृष्टीने हा सभामंच अगर व्यासपीठ असावे, त्यावर अध्यक्षाशिवाय इतरांना बसविणे असल्यास अध्यक्षाची जागा झांकली जाईल अशी व्यवस्था नसावी, विराटसभा असल्यास दूरध्वनिक्षेपकाची योजना अध्यक्षाच उजवे बाजूस असावी. पुष्कळ वेळा ही व्यवस्था मुख्य सभामंचापासून थोडी दूर व अलग असते. तथापि अध्यक्षाचे हुकूम बोलणाच्या वक्त्याला सहज ऐकू येतील इतकी ती जवळ असावी. सभामंच सभेचे स्वरूप व सभास्थान लक्षात घेऊन योग्य प्रमाणांत उंच व योग्य प्रमाणांत चौरस असावा. सभामंचावर कोण बसणार हे सभाचालकांनी आगाऊ योजना करून ठरविणे जरूर आहे. पुष्कळ वेळां हैं न ठरल्याने गोंधळ उत्पन्न होतो. अध्यक्षाचे जवळ एक तरी स्वयंसेवक नेहमी हजर असावा. वक्त्याने सभामंचावर उभे राहून बोलले पाहिजे अशी शिस्त सार्वजनिक सभेत असणे अवश्य आहे,