पान:सभाशास्त्र.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सार्वजनिक सभातंत्र माणसे असली म्हणजे ती सार्वजनिक सभा कायदेशीर होते असे न्यायालयाचे निर्णय आहेत. कायद्याचे दृष्टीने काहीही असले तरी सभेचें सार्वजनिकत्व व लोकप्रतिनिधित्व हे उपस्थित श्रोत्यांच्या संख्येवर अवलंबून आहे हे निर्विवाद आहे. सभेची जाहीर वेळ झाली व दोन माणसे उपस्थित असली तरी सभेचे कार्य सुरू करता येते व ते सुरू करा असे सांगण्याचा व सुरू करण्याचा उपस्थितांपैकी प्रत्येकाला हक्क आहे. सभाचालकांनी वेळेवर व संख्येने लोक येतील अशी व्यवस्था योग्य प्रसिद्धि करून केली पाहिजे. एका पक्षाने बोलाविलेली सभा वेळ होतांच दुसन्या पक्षाचे लोकांनी सुरू करून बाजू मारून नेल्याची उदाहरणे अनेक आहेत. नेपोलियनला पांच मिनिटे उशीर झाला म्हणून वॉटलूचे लढाईत अपयश आले असे म्हणतात; पण एक मिनिट सभाचालकांनी उशीर केल्याने एका प्रसिद्ध राजकीय पक्षाची संघटना, त्यांतील एका गटाकडून दुस-या गटाकडे गेल्याचे उदाहरण महाराष्ट्रांत घडले आहे. गणसंख्येचा नियम अगर संकेत नसल्याने सार्वजनिक सभेबाबत वेळेला प्रसंगी महत्त्व येते. सभाविषयक आक्षेपः—सार्वजनिक सभेला अमुक काळ अगाऊ नोटीस असावी, अगर अमुक पद्धतीनेच जाहीर निमंत्रण असावे, अगर अमुक गणसंख्या असावी असे नियम नाहींत. तथापि यासंबंधींचे जे कांहीं आक्षेप असतील ते अध्यक्षाची निवड होऊन अध्यक्षाचे प्रास्ताविक भाषण सुरू होण्यापूर्वी अगर संपताच घेतले पाहिजेत. अध्यक्षाचे निवडीबद्दलचे आक्षेप, त्यासंबधींची सूचना होतांच अगर सूचना न होतां नियोजित अध्यक्ष स्थानापन्न होऊ लागतांच घेतले पाहिजेत, सभेचे स्वरूपाबद्दल अगर तींत मिळणाच्या प्रवेशाबद्दलचे आक्षेप अध्यक्षाची निवड होऊन तो स्थानापन्न होतांच घेणे योग्य आहे. थोडक्यात म्हणजे अध्यक्षाची निवड झाल्याशिवाय आक्षेप अगर कायद्याचे अगर नियमांसंबंधींचे मुद्दे उपस्थित करू नयेत, कारण या सर्वांसंबंधींचा निर्णय देण्याचा अधिकार अध्यक्षालाच आहे. सभेने निवडलेला अगर मान्य केलेला अध्यक्ष स्थानापन्न होईपर्यंत सभेला पूर्णत्व येत नाहीं. नियमक, नियंत्रक अस्तित्वात येईपर्यंत नियमन व नियंत्रण कोण करणार? हा अधिकार योग्य रीतीनें पदावर आलेल्या अध्यक्षाचा आहे. अध्यक्षाचे अधिकारः- सार्वजनिक सभेच्या अध्यक्षाला मिळणारे आधकार अगर सत्ता ही सभेकडून मिळालेली असते; व ही सत्ता देण्याचा