पान:सभाशास्त्र.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ३४

वक्त्याची ओळख करून देण्यापुरतेच मर्यादित असावे. निवडणुकीबद्दल आभार व सभा पार पाडण्याचे काम सहकार्याची विनंति हींही प्रसंगाने अनुरूप ठरतात. विषयाची ओळख करून देणे म्हणजे सूत्ररूपाने व थोडक्यांतः म्हणजे साधारणपणे दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ न लावतां आटपावें, अध्य क्षाने प्रास्ताविक भाषणांत लांबण लावली म्हणजे श्रोतृवृंदांत चुळबूळ सुरू होते. विषयाची चर्चा अगर मुख्य व नामांकित वक्त्याचे भाषण ऐकण्यासाठी समाज जमलेला असतो तो अधीर होतो; अकारण व सारख्या टाळ्या वाज वून आटोपते घेण्याची सूचना देत असतो. विषयाचे तपशीलवार विवेचन अध्यक्षाने केले म्हणजे मुख्य वक्ता अगर ज्याचे व्याख्यान व्हावयाचे असेल त्याची कुचंबणा होते. त्यावर अन्याय होतो. अध्यक्षाचे विचारसरणीस मतभेद दाखविणे झाल्यास कठीण व पुनरुक्ति केल्यास श्रोतृवृंदास कंटाळा येतो. अध्यक्षाचे लांबलचक प्रास्ताविक भाषण झाल्यानंतर एका सभेत मुख्य व्याख्यात्याने पुढील मार्मिक शब्द काढले. * सद्गृहस्थहो, विषयाचे विवेचन संपूर्णपणे झालेच आहे, समारोप करण्याचे काम मी करतो व ते म्हणजे अध्यक्षाचे आभार मानतो. येवढे म्हणून त्याने आपले भाषण संपविलें, वक्ता विशेष परिचित नसेल, प्रथमच बोलत असेल तर थोडक्यांत त्याची योग्यता सांगावी, त्याचे विस्तारशः चरित्र वर्णन करणे हे अप्रासंगिक ठरते. १९३९ साल पण्यातील एका सभेत अध्यक्षानीं जवाहरलाल नेहरूंची प्रास्ताविक भाषणांत ओळख करून देतांना अर्धा तास घालविला. नेहरूंनी आपला परिचय व ओळख श्रोतृवृंदाला करून दिल्याबद्दल गंभीरपणे अध्यक्षाचे आभार मानले !! अध्यक्षाची अप्रासंगिकता यापेक्षा अधिक समर्पक रीतीने पटवितां आली नसती. श्रोतृवृंदांतील हास्य व टाळ्या यांनी अध्यक्षाची स्थिति केविलवाणी केली. असले प्रसंग टळावेत म्हणून अध्यक्षाने थोडक्यांत आटोपले पाहिजे. प्रास्ताविक भाषणांत सभा किती काळ चालेल व सभेचे पुढील कार्य कसे होईल हे प्रसंगी सांगणे इष्ट ठरते. यामुळे श्रोतृवृंदाला, होणाच्या कार्याची कल्पना येते. गणसंख्या (कोरम ) :-अमुक माणसे हजर असतीलच तर, ती सार्वजनिक सभा कायदेशीर ठरते असा नियम नाहीं. सार्वजनिक सभेला दोन माणसे हजर असली म्हणजे पुरें; कारण एका माणसाची सभाच होत नाहीं. कुणी तरी ऐकणारा असल्याशिवाय वक्ता ही भूमिका पूर्ण होत नाहीं. दोन