पान:सभाशास्त्र.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३३ सार्वजनिक सभातंत्र ہے تم میں سب سے سے بی بی بی سی अध्यक्ष योजणें समयोचित नाहीं. नामवंत विद्वान् अगर त्रिखंडपंडित याचे व्याख्यानाचे वेळीं कांहीं तरी विद्वत्तेवर हक्क सांगणारा अध्यक्ष असला पाहिजे. विशिष्ट सरकारी धोरणावर लोकमत जाहीर करावयाचे आहे अगर सार्वजनिक गा-हाणे राज्यसत्तेच्या कानावर घालावयाचे आहे अगर एखाद्या गोष्टीला व्यापक पाठिंबा आहे हे दाखवावयाचे असेल तेव्हां, लोकप्रियतेच्या दृष्टीने अध्यक्षाची निवड करावी. लोकमताचा प्रतिनिधि म्हणून निवडून आलेले विधिमंडळाचे सभासद अगर नगराध्यक्ष यांची योजना या ठिकाणीं योग्य ठरते. वातावरण गरम आहे, मतभेद तीव्र आहेत, सभा गाजणार हे स्पष्ट दिसत आहे अशा प्रसंग धोरणी, कसलेला, चतुर व समयज्ञ अध्यक्ष असणे अत्यंत जरूर आहे. सार्वजनिक सभेचा अध्यक्ष सभासंचालनशास्त्रांत प्रवीण पाहिजे असे नाही, पण त्याचे सामान्यज्ञान त्याला असले पाहिजे. विराट जनसंमर्द व विशाल सभा काबूत ठेवणे, ती व्यवस्थित पार पाडणे ही अगदी साधी गोष्ट नव्हे. सार्वजनिक सभा असो अगर संघटित संस्थेची नियमानुरूप काम करणारी सभा असो, तिचे यश अध्यक्षावर अवलंबून असते. शांतबुद्धि, न्यायबुद्धि, विवेकी, नम्र पण निश्चयी, हजरजबाबी, खेळीमेळीनें काम करणारा असा अध्यक्ष असावा. जागेचे व प्रसंगाचे महत्त्व ओळखून वागणारा, त्रागा अगर आरडाओरड न करणारा, सर्वत्र पाहणारा, क्षुल्लक गोष्टीकडे दुर्लक्ष करून महत्त्वाची गोष्ट दृढपणे अमलात आणणारा, अल्पसंख्याकांना न्यायाने वागावणारा, वक्त्यावर योग्य नियंत्रण घालणारा, शांत चित्ताने ऐकून निर्णय देणारा दृढमति अध्यक्ष हा सभेची शोभा व प्रतिष्ठा ठरतो. सभा त्याचे योगाने चांगली होते व प्रतिष्ठापण पावते. तो भांडकुदळ असला, भित्रा. असला, उगाच दमदाटीने बोलणारा असला तर सभा बेरंग होते, दंगलही माजते, सभेचा उद्देश विफल होतो. तो चिडका असला तर बाचाबाची होते. दिलेले निर्णय बदलणारा अस्थिरबुद्ध असला तर सभेच्या कामांत अनिश्चितता उत्पन्न होते. भेदरट असला तर सभा मोडण्यांत सभेचे पर्यवसान होते. म्हणून योग्य अध्यक्षाची निवड ही एक महत्त्वाची गोष्ट असते व त्यावर सभेचे सर्व यशापयश अवलंबून असते. याबाबतची अधिक जबाबदारी समाचालकांवर आहे. अध्यक्षाचे प्रास्तविक भाषणः-अध्यक्षाची निवड जाहीर झाल्याबरोबर अध्यक्षाने स्थानापन्न व्हावे. अध्यक्षाचे प्रास्ताविक भाषण विषयाची अगर स...३