पान:सभाशास्त्र.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० सभाशास्त्र زیر می بی مني سبورت बिनविरोध पास झाली असे समजून सूचकानें अध्यक्षास अध्यक्षस्थान स्वीकारण्यास विनंति करावी. दुसरे नांव कुणी रीतसर सभामंचावर येऊन सुचविले व त्या सूचनेला अनुमोदन मिळाले म्हणजे प्रथम सूचना ज्याने केली असेल त्याने आपली सूचना मतांस टाकावी. मते हात वर करण्यास सांगून मोजावत व निकाल द्यावा. बहुमताने त्याची सूचना पास झाल्यास ठीक, नाहींतर दुसरी सूचना मतांस टाकावी. याप्रमाणे तिसरी असल्यास याचप्रमाणे काम व्हावे. मते मोजतांना विरोधकांसमक्ष व त्यांच्या साहाय्याने मोजणी करणे योग्य ठरते. हात मोजून दिलेला निकाल अमान्य असेल तर श्रोतृवृंदांना दोन भागांत मतांप्रमाणे बसण्यास सांगावे व मग मोजणी करावी व निकाल जाहीर करावा. हा झालेला निकाल अखेरचा निकाल असतो. सार्वजनिक सभा असल्याने हजर असलेल्या सर्वांनाच मत देण्याचा अधिकार असतो. निवडून आलेल्या अध्यक्षास अध्यक्षस्थान स्वीकारण्यास त्याचे सूचकाने विनंति करावी. अध्यक्ष बिनविरोध निवडून येणें हें सभेचे व्यवस्थेचे दृष्टीने इष्ट आहे. पुष्कळ वेळां संस्थांमार्फत सार्वजानिक सभा भरते व तिचे नियमाप्रमाणे तिचा अध्यक्ष अगर अन्य कोणी नियमाप्रमाणे या सार्वजनिक सभेचा अध्यक्ष व्हावा असे असते. या नियमसिद्ध अध्यक्षाने अध्यक्षस्थान घ्यावयाचे असेल तर ती व्यवस्था जाहीर निमंत्रणांत स्पष्ट केलेली असावी, त्याचप्रमाण सभाचालकांनी अध्यक्षाची योजना पूर्वी ठरवून ठेवली असेल तर जाहीर निमंत्रणांत ‘अमुक यांचे अध्यक्षतेखाली सभा होईल, असे नमूद करणे योग्य आहे. जर जाहीर निमंत्रणांत अध्यक्षाचा उल्लेख नसेल तर सभाचालकांनी आपले नांव सुचविल्यास दुसरें नांव सुचविले जाण्याचा संभव अधिक असतो. अध्यक्षाचें नांव निमंत्रणांत असेल अगर नियमसिद्ध म्हणून अध्यक्ष ठरला असेल तर अध्यक्षाचा सूचना न करणे श्रेयस्कर ठरते. त्या अध्यक्षाने अध्यक्षस्थान स्वीकारून सभेची सुरवात करावी. सभा कुणीही बोलाविली असो, ती जर सार्वजनिक सभा असेल तर सदरहू सभेचा अध्यक्ष निवडण्याचा हक्क सभेचा आहे, सभा, बोलाविणारांचा नाही. संकेत व परंपरा म्हणून काही गोष्टी होत असतात, नगराध्यक्षाने बोलाविलेल्या नागरिकांचे सभेत साधारणपणे तोच अध्यक्ष असतो. शेरीफने बोलाविलेल्या सभेत तो अगर तेथील नगराध्यक्ष साधारणपणे अध्यक्ष असतो. संस्थेने बोलाविलेल्या सभेत संस्थेचा अध्यक्ष सभापति