पान:सभाशास्त्र.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ सार्वजनिक सभातंत्र सभेला आणखी अडचणच उत्पन्न होते. सभेच्या कार्यक्रमांतच पुष्कळ वेळां गायनाचा कार्यक्रम असतो. तो जसा असेल तसा केलाच पाहिजे असे नाहीं. प्रसंगाला अनुसरून तर तो असलाच पाहिजे, पण उगाच लांबट असतां कामा नये. श्रोते सभेसाठी आलेले असतात, मैफलीसाठी नव्हे. कुणाला तरी ‘संधि मिळावी म्हणून हा गाण्याचा कार्यक्रम नसावा. सभेच्या कार्यक्रमांत काहीही असो नसो, सभा ठरलेल्या वेळी सुरू करणे सर्व दृष्टीने इष्ट आहे. अध्यक्षाची निवडः—सभाचालकांपैकी कोणी तरी अगर नियोजित झाले असल्यास त्याप्रमाणे अध्यक्षाची सूचना मांडणाराने सभामंचावर (Platform यावें. छापील निमंत्रणपत्रिका असेल तर ती वाचून अध्यक्षाचे नांव सुचवावे. ज्याचे नाव सुचवावयाचे असेल त्याची आगाऊ संमति घेतली पाहिजे. आजच्या सभेचे अध्यक्षस्थान श्रीयुत—यांनी स्वीकारावे' असे स्वरूप या सूचनेचे असावे. अध्यक्षाचे सूचनेस अनुमोदन पाहिजेच असे नाही. पण सामान्यतः अनुमोदन दिले जावे. अनेक संस्थांमार्फत अगर पक्षांमार्फत सार्वजनिक सभा बोलाविली असल्यास प्रत्येक पक्ष अगर संस्था यांचा एक प्रतिनिधि अनुमोदक म्हणून ठेवण्यात येतो. तसे करावयाचे असल्यास कोण कोण अनुमोदक आहेत यांची नोंद सभाचालकांजवळ असावी. नाही तर संस्थेचे नांव उच्चारावे व बराच वेळ कोणी येऊ नये अगर कोणी तरी अनाधिकारी माणसाने यावे, व पुढे कुरकूर व्हावी असे होणे इष्ट नाहीं. सभाचालकांत कांहीं जरी कुरबूर झाली, बिनसाबिनसी झाली तरी त्याचा परिणाम हळूहळू सभेचे वातावरणावर होतो. सामान्यतः एकापेक्षा अधिक अनुमोदक नसावेत. अध्यक्षाची सूचना करण्याचा अधिकार सभेत हजर असलेल्या कोणालाही आहे व त्याचप्रमाणे हजर असलेल्या कुणालाही अध्यक्ष होण्याचा हक्क आहे. अध्यक्षाची सूचना करणाराने व अनुमोदकाने अगदी थोडक्यांत भाषण करावें, विषयाचे महत्त्व व सुचविलेल्या अध्यक्षाची लायकी यापलीकडे जाऊ नये. विषयाचे महत्त्व सांगणें म्हणजे विषयाचे विवेचन करणे नव्हे. अगर अध्यक्षाची विषय व सभेपुरती लायकी सांगणे म्हणजे त्याचे चरित्रवर्णन नव्हे हे लक्षात ठेवले पाहिजे, पांच मिनिटांपेक्षा सूचक अगर अनुमोदक यांनी जास्त बोलू नये असा दंडक सर्वमान्य होण्यासारखा आहे. तसेच एकंदर वेळ १५ मिनिटांपेक्षा जास्त सुचनेवर खर्च होऊ नये हीही मर्यादा मान्य होण्यासारखी आहे. सूचना केली, अनुमोदन मिळाले व दुसरे नांव कोणी सुचविलें नाहीं तर ही सूचना