पान:सभाशास्त्र.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३१ सार्वजनिक सभातंत्र Pooja Jadhav (चर्चा) १२:२५, २९ मार्च २०१८ (IST) ~ होतो; त्याचप्रमाणे चालक व सभानियंत्रक यांनी योजिलेला अध्यक्ष सभा साधारणपणे स्वीकारते. तथापि हक्काचा विचार करता सभापति निवडण्याचा अधिकार हा सभेचा म्हणजे उपस्थित असलेल्या सभासदांचा आहे, ही मौलिक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि जेव्हां औपचारिक रीतीने नियोजित अगर नियमसिद्ध अध्यक्षाबाबत सूचना मांडली जाते त्या वेळी सभेतील कोणालाही दुसरे कोणाचेही नांव सुचविण्याचा अधिकार आहे. सूचना मांडून सभेची पसंति मागणे याचा अर्थ सभेचा अधिकार मान्य करणे आहे. सूचना न मांडतां जरी नियोजित अगर नियमसिद्ध अध्यक्ष अध्यक्षस्थानी बसून सभेस सुरवात करू लागला तरी सभेतील कोणालाही उभे राहून सार्वजनिक सभा असलेमुळे अध्यक्षाची रीतसर निवड व्हावी असे म्हणण्याचा व अध्यक्षाची सूचना मांडण्याचा आधकार आहे. मात्र सभेला सुरवात होताच हा आक्षेप घेतला पाहिजे. काम सुरू झाले, ठराव मांडला गेला, कांहीं काम होऊन गेल्यानंतर हा आक्षेप घेणे योग्य नाहीं. कांहीं काम होऊ दिल्याने विद्यमान् अध्यक्षाला मान्यता दिली असे सिद्ध होते. सभा सार्वजनिक असल्यामुळे कोणालाही पदसिद्ध अध्यक्ष होण्याचा अधिकार नाही. सार्वजानिक सभेचा अध्यक्ष त्या सभेने निवडला पाहिजे, अगर त्यास मान्यता दिली पाहिजे. सभाचालकांनी अध्यक्षाची सूचना केली तर ती फेटाळून दुसरी सूचना करता येते; पण जर सूचना न करतांच नियोजित व जाहीर आमंत्रणांत उल्लेखिलेला अध्यक्ष जागेवर बसला व सभेने रीतसर अध्यक्ष सूचना करून नेमावा अशी मागणी केली व सभाचालक व नियोजित अध्यक्ष यांनी ती अमान्य केल्यास काय परिणाम होईल व आक्षेपकांनी कसे वागणे योग्य ठरेल याचा विचार केला पाहिजे. अध्यक्ष म्हणजे नियंत्रक; सभास्थान सभा सपपर्यंत सभासदांवर समाविषयक कार्याचे दृष्टीने त्याला योग्य ते अधिकार गाजविण्याचा हक्क असतो. ही सत्ता त्याला कायद्याने, मान्य केलेल्या नियमानें अगर संमतीनेच मिळते. कायदा व नियम यांचे अभाव सार्वजनिक सभेचा अध्यक्ष प्रत्यक्ष निवडणूक होऊन ठरला पाहिजे अगर सभेने आपल्या वर्तनाने म्हणजे त्याचे ऐकून मान्यता दिली पाहिजे, म्हणजे अप्रत्यक्ष रीतीनें सम्माति दिली पाहिजे. सभेने न निवडलेला अगर अमान्य केलेला अध्यक्ष हा अध्यक्षच होत नाही. सभामंचावरील अध्यक्षाचे खुर्चीवर तो बसल्याने त्याला नियंत्रणाचा अधिकार प्राप्त होत नाहीं. सभेला