पान:सभाशास्त्र.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र .२८ जरूर ती वालण्यास संधि देऊन प्रसंगी शिस्त लावून सभा पार पाडतो. वेळेवर सभा सुरू केली व ठराविक वेळांत संपविण्याचे जाहीर केलें, वक्त्यांची निवड व क्रम न्यायबुद्धीला पटेल असे झाले म्हणजे सभेत शिस्तवार विरोध असला तरी अव्यवस्था व अशांतता होत नाही. जेथे विरोध. संघटित व सभेच्या शिस्तीला सोडून आहे, सारखे ओरडणे, ढकलाढकली करणे, आरोळ्या ठोकणे, दगड वगैरे फेकणे हे होत असेल तेव्हां, अध्यक्षाने जरूर ती सूचना-देऊन गैरशिस्त विरोधकांना ताबडतोब बाहेर काढावे; श्रोतृवृंदाला पोकळ दमदाटी देण्यानें, अगर कमकुवतपणा दाखविल्याने सभा काबूत राहत नाहीं. बाहेर काढून टाकण्याचा निर्णय ऐकून लोकांना अन्याय झाला असे वाटता कामा नये. उलट बहुसंख्याक श्रोते सभेचे काम शांतपणे चालावें यासाठी उत्सुक असता, विरोधकांना योग्य व न्याय्य संधि मतप्रदर्शनार्थ मिळाली असतां, अगर कबूल केली असता ते अयोग्य वागले असेच साधारण मत पडेल, या दृष्टीने अध्यक्षाने योग्य प्रसंग येतांच तसा निर्णय घ्यावा. प्रसंगी थोडा वेळ सभा तहकूब करून विरोधकांचा बंदोबस्त केल्यानंतर सभा सुरू करावी, पण होता होईल तोपर्यंत सभा तहकूब करू नये. कारण तसे केल्याने विरोधकांना फावते व सभेची मांड मोडल्यासारखे होते. सभाप्रारंभः- जाहीर केलेल्या वेळेस सभेला सुरुवात करणे अनेक दृष्टींनीं इष्ट असते. हजर राहू इच्छिणारे सामान्यतः वेळेवर येतात, जे केवळ बघे व सहज डोकावून पुढे जातात त्यांना सभेबद्दल आस्था नसते व ते सभेसाठी येत नसतात. गंमत पाहावी, मित्रमंडळींस भेटावे, खिशांतील शेंगा खातखात ऐकावे, टिंगल करावी या हेतूने येणारे, वेळेवर कधीच येत नसतात. किंबहुना सभाही त्यांचेसाठीं नाहीं. उत्साही, सभाकायत रस घेणारे थोडे जरी असले तरी तेवढ्यांवर चालकांनी समाधान मानून वेळेवर सभेला सुरुवात करावी. श्रोतृवृंद जमेल यासाठी वाट पाहण्यांत जमलेला श्रोतृवंद पांगतो. सभेला सुरुवात होईपर्यंत अनेकजण आसपास उभे असतात. सभेला सुरुवात होतांच ते सभास्थानी येतात. सभेची जाहीर वेळ झाली की सभाचालकांनी सुरुवात न केल्यास उपस्थित श्रोत्यांपैकी कोणालाही सभेला सुरुवात करण्याचा हक्क आहे हे विसरता कामा नये, कांहीं वेळा गाण्याचा कार्यक्रम करून थोडा वेळ काढता येतो. तेवढ्यांत श्रोते जमण्याची आशा असते. तथापि गायक हा गायक असावा, त्याने प्रसंगोचित पद गावें; नाहींतर त्याची टिंगल होऊन