पान:सभाशास्त्र.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशात्र २६

सभेचा बेरंग होतो. पुष्कळ वेळा विषयाचे महत्त्व नसते, पण जाहीर झालेला वक्ता नामवंत अगर प्रभावी अगर प्रथमच तेथे बोलणारा असतो म्हणून साहजिक श्रोतृवृंद जास्त येते हे लक्षात घेऊन समाचालकांना सभास्थानाची योजना केली पाहिजे. सभाचालकांना वक्ता, विषय व परिस्थिति या तिन्हींची नीट कल्पना असावयास पाहिजे; व त्या दृष्टीने योग्य सभास्थान, सभाकाल व सभापति यांची योजना केली पाहिजे. विषय क्षुल्लक असेल, पण गांवांत मतभेदाचे वातावरण तीव्र असेल तर, सभा असाधारण परिस्थितीत होणार हे जाणून व्यवस्था ठेवली पाहिजे. सुटीचे दिवशीं सभा असेल, उन्हाळ्यांत रात्रीची असेल तर श्रोतृवृंद जास्ती जमतो. तात्पर्य, श्रोतृवृंदाचा अंदाज बांधून सभास्थान ठरवावे. हाताच्या बोटांनी मोजण्याइतकेच श्रोते व अफाट सभागृह अगर मैदान हाही विरोध नसावा. याने सभेला रस येत नाहीं, वक्ता निरुत्साही होतो व श्रोत्यांनाही गळती लागते. उलट, अलोट जनसंमर्द, बसण्याची व्यवस्था नाहीं, दूरध्वनिक्षेपकाची व्यवस्था नाही, अशी स्थित झाली म्हणजे जो तो पुढे जाण्याची खटपट करतो, आरडाओरडा होतो, वक्त्याचे बोलणे ऐकू येत नाहीं, कांहीं तरी सभा होते, लोक कंटाळतात व व्यवस्थापकांना नांवें ठेवीत परततात. || योग्य व पुरे पडेल असे सभास्थान निवडणे येवढ्यानेच भागत नाही. काणी कुठे बसावे या दृष्टीने समाचालकांनी व्यवस्था करणे जरूर आहे. स्त्रियांसाठीं, प्रमुख अगर खास निमंतित, तसेच नियोजित वक्ते यांच्यासाठी जागा राखून ठेवणे हा चांगला उपक्रम ठरतो. त्याचप्रमाणे सर्वसामान्य श्रोतृवृंदाला कोठे बसावे हे सांगणारे स्वयंसेवक अगर कार्यकर्ते योग्य जागी ठेवून पद्धतशीर रीतीने श्रोत्यांना बसवीत गेल्यास सुंदर व्यवस्था राहते व त्यापासून सर्वांनाच आनंद होतो, मैदानांतील सभेत दोच्यांनी चौक करून, जाण्यायेण्यासाठी मार्ग ठेवून सभास्थानाची आगाऊ आखणी करून ठेवावी. तीव्र वातावरण आहे, सभेत अडथळा उत्पन्न होणार आहे याची आगाऊ कल्पना साधारणपणे असली तर, पुष्कळ वेळां सभेतील येणा-या ठरावाचें अगर विषयाच्या बाजूचे व विरोधक यांना निरनिराळ्या ठिकाणी बसविण्याची व्यवस्थाही कांहीं वेळा करण्यात येते; पण प्रथमपासून लोक आपआपली मते बनवून आले. आहेत असे मानणे म्हणजे सभा या विचारविनिमयाच्या माध्यमाची किंमत शून्य समजण्यासारखे आहे. सभासदांनी चर्चा ऐकून,