पान:सभाशास्त्र.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संभाशास्त्र ३०८ त्याप्रमाणे नोंद घ्यावयास पाहिजे व नंतर निर्णय जाहीर केला पाहिजे. सदर प्रश्नाचे ठरावावर अनुकूल व विरुद्ध मते देणाच्या सभासदांची नांवें प्रोसिडिंग वुकांत दाखल केली पाहिजेत. | (४४) मते घेण्याचे वेळीं सभासदांनी शांतता राखली पाहिजे व मतमोजणीनंतर निकाल जाहीर करीतोंपर्यंत त्यांनी आपली जागा सोडू नये. एखाद्या विषयाचा अगर ठरावाचा विचार पुढील सभेचे वेळी व्हावा अशी सूचना आल्यास तिचा विचार सभेत आधी व्हावयास पाहिजे. वेळेच्या अभावी पुढे ढकलण्यांत आलेली सभा सभेचे अध्यक्षांना विषयांचे यादींतील सर्व विषय संपेपर्यंत चालवितां येईल, (४५) सभेचे अध्यक्षांना कळविलेशिवाय कोणत्याही सभासदास सभा सोडून जातां येणार नाहीं. | (४६) अध्यक्षांचे देखरेखीखालीं सभा चालू असतांना विषयांचे ठरावांची टिपणे घेतली पाहिजेत. घेतलेल्या टिपणांत विषयासंबंध आलेल्या भाषणांतील मुख्य मुद्दे असले पाहिजेत. (४७) सभेचे तारखेपासून १० दिवसांचे आंत सभेचे ठराव प्रोसिडिंग बुकांत लिहिले पाहिजेत, व सभेचे प्रोसिडिंग बोर्डाकडून कायम केले जाईपर्यंत सभेच्या टिपणांचा नाश करू नये. - (४८) सब्कमिटी पुढील सूचनेस रीतसर अनुमोदनाची अगर ती सभेस वाचून दाखविणेची जरुरी नाहीं. सभासदांनी उभे राहून बोलण्याचे कारण नाहीं. एखादी सूचना परत घेणेस अगर त्यांत दुरुस्ती सुचविणेस कोणतेही प्रकारे हरकत नाहीं. इतर बाबतींत बोर्डाचे सभेचे नियम शक्य तो सब्कमिटीचे सभेस लागू केले जातील. सब्कमिटीचे सर्वसाधारण अगर जादा सभेस निव्वळ सात दिवसांची सूचना सभासदांस देणेस पाहिजे. सदर सूचनेत सभेची वेळ, जागा व सभेपुढे ठेवणेत येणारे विषयांचा उल्लेख असावयास पाहिजे. (४९) सबूकमिटीचे एखाद्या सभासदास सभेपुढे एखादा विषय चर्चकरितां ठेवावयाचा असल्यास त्याने त्याबद्दल सभेचे तारखेपूर्वी एक दिवस अगोदर कमिटीचे चेअरमन यांना सूचना देणेस पाहिजे, (५०) डि, लो, बोडचे कोणतेही सभासदास सबूकमिटीचे सभेस हजर