पान:सभाशास्त्र.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०७ पुणे जिल्हा लोकल बाडने केलेले नियम यांवर सभासद सूचनेस अथवा उपसूचनेस अनुकूल आहेत असे विचारून मते घेण्यांत येतील, (२) ज्या वेळी एकापेक्षा अधिक उपसूचना असतील त्या वेळी सर्वांत शेवटीं आलेली उपसुचना व त्यापूर्वी आलेली उपसूचना यांवर मते घेतली जातील व त्यांतून पास झालेली उपसूचना व त्या दोहोंच्या अगोदरची उपसूचना यांवर मते घेतली जातील, व या क्रमाने शेवटी एक उपसूचना राहीपर्यंत मते घेतली जातील, यानंतर एकच राहिलेली उपसूचना व मूळ सूचना यांवर मते घेतली जातील, अध्यक्षांस वरील क्रमांत जरूर वाटल्यास बदल करण्याचा अधिकार आहे. (३७) वरील कलम १ अथवा २ यामधील पास झालेली सूचना अगर उपसूचना मुख्य ठराव म्हणून पुन्हा मतास घेतली जाईल आणि त्याचा निकाल सभेचे मत म्हणून समजले जाईल, (३८) कोणतीही उपसूचना सर्वानुमतें पास झाल्यास ती मूळ ठराव म्हणून नोंद करण्यांत येईल, (३९) सर्वसाधारणपणे मते हात वर करून घेतली जातील, परंतु सभेनें ठरविल्यास मतदानपद्धतीने घ्यावीं. (४०) हजर असलेल्या कोणाही सभासदास त्यास वाटल्यास मत देण्या पासून अलिप्त राहता येईल. (४१) ज्या वेळी मतें गुप्त मतदानपद्धतीने घेतली जातील त्या वेळी अध्यक्ष ठरवितील त्या पद्धतीने सभासद आपली मते लेखी देतील, अशा त-हेच्या लिखाणावर सह्या केल्या जाणार नाहीत आणि ते बोडने निवडलेल्या दोन तपासनीस व अध्यक्ष यांशिवाय कोणास पाहता येणार नाहीं. हे कागदपत्र घेतलेल्या मतांचा निकाल सांगितल्यानंतर ताबडतोब नाश केले जातील, (४२) ज्या वेळीं अनुकूल व विरुद्ध मते सारखीं पडतील त्या वेळी अध्यक्ष यांनी आपल्या जादा मताचा उपयोग केला पाहिजे, (४३) मते हात वर करून घेतल्यावर एखाद्या प्रश्नाचा निर्णय जाहीर तेवेळी जर कोणत्याही सभासदाकडून अनुकूल व विरुद्ध सभासदांच्या नांवांची नोंद करून घ्यावी असे सुचविणेत येईल तर सभेचे अध्यक्षांनी