पान:सभाशास्त्र.pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०९ पुणे जिल्हा लोकल बोडने केलेले नियम

राहणेस हरकत नाही. परंतु जे सब्कमिटीचे सभासद नाहींत त्यांना सभेचे वेळी चर्चेत भाग घेता येणार नाहीं. (५१) सब्कमिटीने केलेले ठराव ठरावाचे तारखेपासून तीन महिन्यांचे आंत बदलता येणार नाहींत. बदलणे झाल्यास त्याला कमिटीचे ३ सभासदांची संमति पाहिजे. (५२) सब्कमिटीचा एखादा सभासद लागोपाठ पांच सभांस जर गैरहजर राहील तर तो त्यापुढे सब्कमिटीचा सभासद राहू शकणार नाही. त्याचे जागी बोडकडून नवीन सभासद नेमणेत येईल. डि. लो, बोडस सब्कमिटींतून वरील कारणास्तव कमी झालेल्या सभासदाससुद्धा पुन्हा सबूकमिटीचा सभासद म्हणून नेमतां येईल. (५३) बोडने एखाद्या विषयाबद्दल रिपोर्ट करण्यासाठी नेमून दिलेल्या मदतींत सबूकमिटीची सभा झाली नाही तर ती सव्कमिटी रद्द झाली असे समजणेत येईल व तो विषय डि. लो, बोडोंचे सभेचे विषयांचे यादींत घातला जाईल. (५४) एक हजेरीबुक ठेवण्यात येईल. सदर बुकांत हजर असलेल्या में सभासदाने आपले नांवापुढे बोर्डाच्या अगर सब्कमिटीच्या सभेस हजर राहिल्याबद्दल सही केली पाहिजे, (५५) त्याचप्रमाणे दुसरें एक हजेरीबुक ठेवणेत येईल. त्यांत मे, सभा सदांची हजेरी, गैरहजेरी अगर रजा मे, चीफ ऑफिसरसाहेब यांनी मांडली पाहिजे,