पान:सभाशास्त्र.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ३०६ केलेले भाग त्यांस सूचना अगर अनुमोदन न घेता त्यांना योग्य वाटेल अशा त-हेने मतास टाकतील. । (३१) एखाद्या विषयावर वादविवाद चालू असतां जर एखादी उपसूचना सुचविण्यांत आली तर मूळ सूचनेवर किंवा अगोदरच्या उपसुचनेवर बोललेल्या एखाद्या सभासदास पुन्हा नवीन उपसूचनेवर बोलतां येईल, परंतु अशा वेळी सदर उपसूचनेत घातलेल्या नवीन बाबीपुरतेच त्याने बोलले पाहिजे. (३२) सूचना मांडणारास ती सभेपुढे मांडण्याकरितां १० मिनिटे दिली जातील व इतरांस त्यासंबंधीं बोलण्यास ५ मिनिटे दिली जातील. परंतु अध्यक्षांना योग्य वाटल्यास ते जास्त वेळ देतील, वादविवादानंतर उत्तर देण्यास फक्त ५ मिनिटे दिली जातील, (३३ ) अध्यक्षांच्या खास परवानगीशिवाय एखाद्या सूचनेवर किंवा उपसूचनेवर सभासदांस अधिक वेळ बोलता यावयाचें नाहीं. मात्र मूळ ठराव ज्याने मांडला आहे त्यास किंवा त्याने आपला हक्क सोडल्यास अनुमोदन देणाच्या सभासदांस वादविवादाचे शेवटीं५ मिनिटें उत्तरादाखल बोलतां येईल व त्या वेळी वादविवादांत सभासदांनी उपस्थित केलेल्या मुद्दयावरच त्यांनी भाषण केले पाहिजे, (३४) वादविवादाचे शेवटी सर्वांत मागाहून उपसूचना आणणारे सभासद् उत्तर देतील.त्यानंतर त्या उपसूचनेच्या अगोदर उपसूचना आणणारे सभासद् उत्तर देतील व अशा क्रमाने शेवटीं मूळ सूचना मांडणारे सभासद उत्तर देतील. | (३५) कोणतीही उपसूचना कोणत्याही वेळी आणण्यास परवानगी देण्याचे अध्यक्षांचे मर्जीवर अवलंबून राहील. (३६) अध्यक्षांनी एखाद्या सभासदाच्या सूचनेवरून एखाद्या विषयावरील वादविवाद बंद करून सूचना व उपसूचना मांडणाच्या सभासदांस वादविवादांत उत्पन्न झालेल्या प्रश्नास उत्तरे देण्यास सांगून व आपलेही त्यासंबंधी विचार जरूर तर मांडून सदर सूचना मतास घालता येईल. वादविवादानंतर किंवा वादविवाद बंद केल्यानंतर खालीलप्रमाणे मते घेतला जातील, (१) ज्या वेळी एकच उपसूचना असेल त्या वेळीं मूळ सूचना व उपसूचना