पान:सभाशास्त्र.pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०५ पुणे जिल्हा लोकल बोर्डाने केलेले नियम परंतु उपसूचना ही मूळ सूचनेस अगर पूर्वीच्या उपसूचनांस अगदी नकारार्थी असता कामा नये. तथापि सभेपुढे असलेल्या विषयांसंबंधी आलेल्या सूचनेविरुद्ध अगर उपसूचनेविरुद्ध किंवा पूर्वी आलेल्या एखाद्या सूचनेसारखी अगर उपसूचनेसारखीच असून जी नामंजूर झाली आहे किंवा घेतली गेली नाहीं त्यासारखीच दुसरी उपसूचना असू नये. मात्र एखादी सूचना नकारार्थी असल्यास त्याविरुद्ध होकारार्थी दुरुस्ती किंवा सूचना मांडता येईल. (२३) एका सूचनेवर एकाच वेळी कितीही उपसूचना मांडतां येतील. कोणाही सभासदास एकापेक्षा अधिक उपसूचना मांडता येणार नाहीत, अगर अनुमोदन देता येणार नाहीं, व सूचना मांडणाच्या अगर सूचनेस अनुमोदन देणाच्या सभासदास उपसूचना मांडतां अगर त्यास अनुमोदन देता येणार नाहीं. | (२४) कोणताही ठराव अगर उपसूचना ही योग्य रीतीने सुचविल्याशिवाय आणि अनुमोदन मिळाल्याखेरीज चर्चेस घेता येणार नाही. मात्र अध्यक्षांनी मांडलेल्या उपसुचनेस अनुमोदनाची जरुरी नाहीं. (२५) सभेपुढील सुचविणेत आलेली व अनुमोदन मिळालेली सूचना अगर उपसूचना ही अध्यक्ष सभेस वाचून दाखवावयास लावतील आणि नंतर ती चर्चेस घेतील. (२६) सूचना आणणारे सभासद् तिच्या पुष्ट्यर्थ बोलतील, आणि अनुमोदन देणारेही बोलतील अगर चर्चेनंतर बोलण्याचा आपला हक्क राखून ठेवतल, | (२७) सुचविलेली आणि अनुमोदन दिलेली सूचना ही अनुमोदन देणाराचे संमतीने आणि सभेने परवानगी दिल्यास सुचविणाच्या सभासदास परत घेता येईल. (२८) नापास झालेला अगर परत घेतलेला ठराव हा त्या सभेत पुन्हा घेता येणार नाही. मात्र तीस मिनिटांनंतर सभेच्या तहकुबीची सूचना आणता येईल, (२९) एकाच वेळी दोन अगर त्यापेक्षा जास्त सुचना आल्यास कोणते क्रमानें त्यासंबंधी विचार करावयाचा हे अध्यक्ष ठरवितील, | (३०) सभेपुढील सूचनेचे अगर उपसूचनेचे सोयीकरितां म्हणून त्यांतील अर्थ न बदलतां दोन अगर त्यापेक्षा जास्त भाग अध्यक्ष करतील आणि असे स....२०