पान:सभाशास्त्र.pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र ३०४ (१२) मे. प्रेसिडेंटसाहेब यांना सभासदांनी विचारलेला प्रश्न अगर मागितलेली माहिती त्यासंबंधी थोडक्यांत कारणे देऊन नाकारता येईल. | (१३ ) ज्या प्रश्नाला एकदां उत्तर दिले गेले आहे त्यावर वादविवाद करितां येणार नाही. परंतु सदर प्रश्नाला अनुलक्षून जास्त माहिती पाहिजे असल्यास ती मागतां येते. (१४) ज्या सभासदास भाषण करावयाचे असेल त्याने उभे राहून प्रेसिडेंटसाहेब यांना उद्देशून सभेपुढील विषयास धरून करावयास पाहिजे. (१५) एकाच वेळी दोनपेक्षा जास्त सभासद बोलण्यास उभे राहिले असतां अगोदर कोण बोलावें हें मे, प्रेसिडेंटसाहेब यांनी ठरवावे व त्यांचा या बाबतचा निकाल अखेरचा समजावा. (१६) प्रेसिडेंटसाहेब यांनी सभेचे काम शिस्तीने चालविले पाहिजे व सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांचा निर्णय दिला पाहिजे, सदर निर्णयावर वादविवाद चालणार नाहीं. (१७) अध्यक्षांनी सभासदांस शिस्त पाळणेस सांगितली असता त्यांनी ती पाळली पाहिजे व आपले जागी बसले पाहिजे. (१८) जर एखादा सभासद अध्यक्षांचे हुकुमांची अमान्यता करील, गर्हणीय वर्तन करील अगर सभेत अडथळा आणील तर अशा सभासदांस बाकी राहिलेल्या सभेपुरतें सस्पेंड करण्यात यावे म्हणून अध्यक्ष सभासदास विचारतील, यावर कोणतीही चर्चा केली जाणार नाही. आणि जर बहुमताने तसे ठरले तर अशा सभासदाने सभेतून गेले पाहिजे, न गेल्यास अध्यक्षांनी योग्य ती मदत मागावी. | (१९) चर्चेस सुरवात होणेचे अगोदर प्रत्येक सूचना अगर उपसूचना, तहकुबीची सूचना सोडून ही इंग्रजीत अगर मराठींत लेखी लिहून अध्यक्षांकडे दिली पाहिजे, | (२०) सूचना येऊन तिला अनुमोदन मिळाल्यावर हजर असलेल्या सभासदांपैकी कोणाही सभासदास सदर सूचनेस उपसूचना आणता येईल. (२१) अजेंड्यावरील विषयासंबंधी कोणाही सभासदास ठराव मांडतां येईल व अनुमोदनही देता येईल. (२२) उपसूचना ही सुचनेस धरून असली पाहिजे. परंतु सुचनेत फेरबदल किंवा कमीजास्त होईल अशा त-हेची उपसूचना असल्यास चालेल,