पान:सभाशास्त्र.pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुणे जिल्हा लोकल बोर्डाने लोकल बोर्ड कायद्याचे कलम ३५ ( १ ) खाली केलेले नियम. | (१) बोडच्या सभा बोर्डाच्या ऑफिसांत भरविणेत येतील. (२) जिल्हा लोकल बोर्डाच्या लैमासिक सभा मे, ऑगस्ट, नोव्हेंबर व फेब्रुवारी या महिन्यांत पहिल्या आठवड्यांत (तारीख ८ अगर त्यापूर्वी ) दुपारी भरविणेत येतील.' । (३) ज्या सूचना सभासदांकडून सभेचे तारखेपूर्वी ३० दिवस येतील अशा सुचना सभेच्या नोटिशीत घेतल्या जातील. जादा सभेच्या नोटिशांत ज्या सूचना सभासदांकडून सभेचे तारखेपूर्वी २१ दिवस येतील अशा सूचना घातल्या जातील. तथापि ज्या विषयाकरितां सभा बोलाविली आहे त्या विषयास प्राधान्य दिले जाईल, (४) त्रैमासिक हिशेबांचे तक्ते वैमासिक सभेच्या अजेंड्यावर मंजुरीकरितां घेतले जातील. (५) सभेच्या अजेंड्यावरील सर्व विषय सभासदांचे माहितीकरितां सभेचे तारखेपूर्वी निदान त्रैमासिक सभेच्या बाबतींत १० दिवस व जादा सभेच्या बाबतींत ७ दिवस तरी आधी तयार ठेवले जातील. (६) अर्धा तासपर्यंत जर सभेचें कोरम झाले नाही तर अध्यक्ष योग्य मुदतीपर्यंत सभा तहकूब करतील, | (७) अध्यक्ष स्थानापन्न झालेनंतर मागील सभेचे प्रोसिडिंग त्यांत कांहीं दुरुस्ती सुचविणेत आल्यास त्यासंबंधी बोर्डाचे मत (Sense ) घेऊन कायम करणेत येईल व त्यावर अध्यक्ष आपली सही करतील, सदर प्रोसिडिंग सभेचे तारखेपूर्वी ७ दिवस सभासदांचे माहितीकरितां तयार ठेवले पाहिजे. (८) कोणताही विषय अगोदर घेणे अगर तहकूब करणे यासंबंधी सूचनेवर वादविवाद करता येणार नाही. जो सूचना मांडणारा आहे त्याला फक्त त्यासंबंधी खुलासा करितां येईल, (९) सभेचे काम मराठींतून चालविले जाईल व प्रोसिडिंग मराठींतच लिहिले जाईल. (१०) जनरल बॉडीचे सदर तारखेपर्यंतचे सर्व ठराव एका रजिस्टरांत लिहून ठेवावयास पाहिजे, (११) जी माहिती मे. प्रेसिडेंटसाहेब यांना आगाऊ १५ दिवस लेखी विचारलेली असेल ती सभेचे काम सुरू होणेचे अगोदर दिली जाईल,