पान:सभाशास्त्र.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सुभाशास्र ३ ०२ अगर कोणत्याही ठरावावर वादविवाद करता कामा नये. मात्र ही परवानगी कोणताही ठराव पास झाल्यानंतर ३ महिन्यांचे आंत त्या ठरावांत फेरफारासाठींच्या अगर रद्द करण्यासंबंधींच्या सूचनेच्या किंवा ठरावाच्या बाबत देता कामा नये. १२. अध्यक्षस्थानी असलेला अधिकारी हजर असलेल्या सभासदांचे बहुमताने संमति दिल्यास सभा वेळोवेळी तहकूब करील. मात्र जी सभा वेळोवेळी तहकूब करणेत आली त्या सभेत जे काम निकाल न होतां राहिले असेल त्याखेरीज कोणतेही काम अशा तहकूब केलेल्या कोणत्याही सभेत करता कामा नये. | १३. पंचायतीने पास केलेल्या कोणत्याही ठरावांत पंचायतीनें तो पास झाल्यापासून ३ महिन्यांचे आंत फेरफार करू नये अगर रद्द करू नये. फेरफार अगर रद्द करणे असेल तर पोट-नियम नं. ५ यांत लिहिलेप्रमाणे नोटीस दिली पाहिजे. आणि सदर नोटिशींत ज्या ठरावांत फेरफार करावयाचा आहे अगर जो ठराव रद्द करावयाचा आहे तो ठराव पूर्ण लिहून आणि सदर रद्द करण्याची अगर त्यांत फेरफार करण्याची कारणासहित सूचना निर्दिष्ट केली पाहिजे. शिवाय सदर फेरफार करण्याचा अगर रद्द करण्याचा ठराव पंचायतीचे मासिक सभेच्या वेळी पंचायतीचे एकंदर सभासदांच्या निम्यापेक्षा कमी नाहीं इतक्या सभासदांनीं मंजूर केला पाहिजे, १४. पंचायतीच्या प्रत्येक सभेच्या वेळी झालेल्या कामांची नोंद मराठीत एका बुकामध्ये केली पाहिजे, या बुकांत हजर सभासदांची नांवें, झालेल्या कामांचा निकाल आणि एखाद्या विषयाचा एकमताने निकाल झाला नसेल तर बहुमत व अल्पमतवाल्या सभासदांची नांवे लिहिण्यांत यावीत. प्रोसिडिंगवर अध्यक्षस्थानी असेल त्यांनी सही केली पाहिजे. सभेचे प्रोसिडिंग पुढील सभेच्या वेळी कायम करणेत आले पाहिजे, या प्रोसिडिंगची एक नक्कल प्रेसिडेंट, जिल्हा लोकल बोर्ड, यांचेकडे पाठविली पाहिजे. आणि प्रोसिडिंग योग्य वेळी पाहण्याची मोकळीक कोणाही पंचायतीचे सभासदास अगर गांवांतील रहिवाशास असली पाहिजे,