पान:सभाशास्त्र.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०१ मुंबई ग्रामपंचायतीचे पोटनियम वेळी विचारांत घेण्यात यावेत व त्यांचाच निर्णय त्या सभेत अगर त्या सभेनंतर होणा-या एखाद्या तहकूबसभेत करण्यात यावा. - ७ अ. पंचायतीपुढे चालू असलेली कोणतीही चौकशी किंवा विचार गुप्तपणे करणे जरूर आहे असे अध्यक्षस्थानी बसणाच्या अधिका-यांस वाटेल तेवढी बाब खेरीज करून प्रत्येक सभेला येणेविषयी लोकांस मोकळीक असली पाहिजे. मात्र असे ठरविले आहे कीं, चाललेल्या कामास कोणताही मनुष्य हरकत करील तर त्यास कोणत्याही वेळी सभेबाहेर घालवून देवविण्याचा सदरहू अधिका-यास अखत्यार आहे. व. जर एखादा सभासद् अध्यक्षस्थानी असणाच्या अधिका-यांचे हुकुमाची अमान्यता करील, गर्हणीय वर्तन करील, अगर सभेत अडथळा आणील तर अशा सभासदास बाकी राहिलेल्या सभेपुरतें सभेच्या बहुमतानें सस्पेंड करण्यात यावे, मात्र अशा ठरावावर चर्चा करणेत येऊ नये. आणि तसे ठरले तर अशा सभासदाने सभागृहांतून बाहेर गेले पाहिजे; न गेल्यास अध्यक्षाने योग्य ती मदत मागावी. ८. प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान सरपंचाने घ्यावे. तो गैरहजर असेल तर डेप्युटीसरपंचाने घ्यावे, व हे दोघेही गैरहजर असतील तर हजर असलेल्या सभासदांपैकी ज्या एका सभासदास हजर असलेले सभासद बहुमताने चेअरमन म्हणून पसंत करतील त्या सभासदानें अध्यक्षस्थान घ्यावे. ९. सर्व बाबींचा निकाल हजर असणा-या सभासदांच्या बहुमताने केला पाहिजे. आणि ज्या बाबतींत दोन पक्ष होऊन उभयपक्षीं सारखी मते पडतील त्या बाबतीत त्या सभेच्या अध्यक्षाने दुसरें अगर निर्णयात्मक मत दिले पाहिजे. | १०. सभेत कोणत्या क्रमाने विषय घेण्यात यावेत ही गोष्ट अध्यक्षस्थानी बसणाच्या अधिका-यांनी ठरविण्याची आहे. मात्र कोण सभासदाने एखादा विषय अगोदर घ्यावा असे सुचविलें तर ती सूचना अध्यक्षस्थानी असणारा अधिकारी सभेपुढे ठेवील आणि सदर सूचनेस अनुकुल व प्रतिकूल मते पडून ज्याचें बहमत होईल त्याप्रमाणे त्याने चालले पाहिजे, ११. अध्यक्षस्थानी बसणाच्या अधिका-याच्या परवानगीशिवाय कोणतीही मासिक सभा बोलाविणेच्या नोटिशीत किंवा विशेष सभेसाठींच्या लेखी विनंतींत नमूद असलेल्या कामाखेरीज इतर कोणतेही काम करता कामा नये,