पान:सभाशास्त्र.pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मुंबई ग्रामपंचायतीचा कायदा सन १९३३ चे कलम १०९ खालील पोटनियम कलम १९ खाली केलेले पोटनियम १. प्रत्येक पंचायतीची सभा दर महिन्यास निदान एकदा तरी भरली पाहिजे, २. पंचायतीची साधारणसभा महिन्याचे १ ले आठवड्यांत सरपंच अगर सरपंचाचे रजेत डेप्युटीसरपंच ठरवील त्या दिवशीं भरेल, ३. सरपंचास योग्य दिसेल तेव्हां अगर पंचायतीच्या एकंदर सभासदांच्या संख्येच्या एकचतुर्थांशाहून कमी नाही इतक्या सभासदांची लेखी विनंती पोहोचल्यापासून अगर प्रेसिडेंट जिल्हा लोकलबोर्ड यांनी विशेष कामाकरिता सभा बोलवावी असे कळविल्यापासून ७ दिवसांचे आंत पंचायतीची विशेष जादा सभा बोलाविण्यांत आली पाहिजे. ४, पंचायतीची सभा पंचायतीचे ऑफिस असेल तर ऑफिसांत अगर गांवच्या चावडींत अगर ज्या ठिकाणी जाण्यास लोकांस प्रातबंध नाही अशा सार्वजानिक जागीं भरविण्यात येईल, ५. पंचायतीच्या सभासदांस पंचायतीच्या साधारणसभेची नोटीस सभेच्या आधी निव्वळ पांच दिवस व विशेष सभेची नोटीस निव्वळ तीन दिवस पाठविण्यांत आली पाहिजे. आणि सदर नोटीशींत सभेची जागा व वेळ आणि सभेत करावयाची कामें ही नमूद केली पाहिजेत, कोणी सभासद गैरहजर असतील तर नोटीस त्यांचे घराचे दारावर डकविण्यांत यावी. त्याच प्रमाणे एक नोटिशीची प्रत गांवचे चावडीवर व पंचायतीचे ऑफिसवरही लावण्यांत यावी. | ६. पंचायतीच्या सभेत सुरवातीपासून शेवटपर्यंत पंचायतीच्या एकंदर सभासदांच्या निम्यापेक्षा अधिक सभासद हजर असलेशिवाय कोणतेही काम करणेत येऊ नये. कोरम नसेल तर अध्यक्षस्थानी बसणाच्या अधिका-यांनी तो दिवस सोडून त्यांस योग्य वाटेल तो दिवस व वेळेपर्यंत सभा तहकूब करावी. अशी तहकूब झालेली सभा पुन्हा भरविण्यात येईल त्या वेळेस कोरम असण्याची जरुरी नाही. मात्र सर्व सभासदांना अशा तहकूबसभेची लेखी सूचना पाठविण्यांत आली पाहिजे. आणि मूळ सभेच्या वेळी कोरम असते तर जे विषय घेण्यात आले असते तेच विषय या तहकूबसभेच्या