पान:सभाशास्त्र.pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २९६ . पैकी एखाद्यास आपण मुळींच मत देऊ नये असे वाटल्यास त्याने मत देऊ नये. । ३९. सारखी मते पडल्याचा परिणामः—जर एखाद्या बाबतीत दोन्ही बाजूस सारखी मते पडली व अध्यक्ष हे आपले कास्टिंग (निर्णयात्मक) मत देत नसले तर सदर प्रश्न अनिर्णित राहिला असे समजून तो पुढील एखाद्या सभेच्या वेळी पुन्हा वाटल्यास सभेपुढे मांडता येईल, ४०. निकाल जाहीर करणे :–मते घेतल्यानंतर लागलीच अध्यक्षांनी ४३ व ४५ नियमांमध्ये सांगितलेल्या गोष्टींस पाल राहून मतमोजणीचा निकाल ताबडतोब जाहीर करावा, व तो वृत्तांतांत योग्य तव्हेने नमूद करून ठेवावा. | ४१. पोल मागणे :–हात मोजून देण्यांत आलेल्या मतांचा निकाल जाहीर करतांना जर तीन अगर अधिक सभासदांनी पोल मागितला तर अध्यक्षांनी मते घ्यावीं व पुन्हा निकाल जाहीर करावा आणि ज्या सभासदांनीं अनुकूल किंवा प्रतिकूल मते दिली असतील अशांची नांवें वृत्तांतांत नमूद करून ठेवावी. ४२, कमिट्या किंवा अधिकारी नेमण्याबाबत मते घेणेः–कमिट्या व अधिकारी यांची बॅलटच्या पद्धतीने नेमणूक करावयाची असल्यास ती खालील पद्धतीने होईल :--- | (१) उमेदवारांची नांवे असलेले, छापलेले किंवा टाईप केलेले कागदाचे तुकडे निवडणुकीकरितां ठरविलेल्या सभेत हजर असलेल्या सभासदांना देण्यात येतील. त्यांना ( सभासदांना ) ज्याला मत द्यावयाचे असेल त्या उमेदवारांच्या नांवांपुढे फुली करून स्लिपांवर सही न करता मतदान करावे. पहिली मतनोंदणी ( बॅलट ) आरंभ झाल्यापासून १५ मिनिटे चालू राहील. सर्व उमेदवारांची मते अध्यक्षांनी चीफ-ऑफिसर किंवा म्युनिसिपालिटीचे इतर कोणी ऑफिसर किंवा कोणीही सभासद (अध्यक्षांच्या मतास वाटेल त्याप्रमाणें ) यांच्या मदतीने करावी. (२) पहिल्या बॅलटचा ( मतनोंदणीचा ) निकाल जाहीर केल्यावर ज्या उमेदवारांत सर्वात कमी मते पडली असतील त्याचे नांव काढून टाकण्यांत यावे आणि मुळांतून राहिलेल्या उमेदवारांत पुनः मतनोंदणी (बॅलट) करावी, नंतर त्यांत सर्वात कमी मते पडणाच्या उमेदवाराचे नांव काढून टाकावे.