पान:सभाशास्त्र.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९५ पुणे शहर म्युनिसिपालिटीने केलेले नियम

عرعر عرعر عرعر عر مرمرمي عرعر عرعر عرعر عرعر عرعر عرعرعرعی هرمی (अ) नियम नं. ४५ च्या प्रॉव्हिजो ( ब ) अन्वयें सभेचे मत घेत असल्यास; | ( ब ) अॅक्टाचे कलम ३५ (८) अन्वये ( नियम नं. १८(३) विचारांत घेऊन ) प्राधान्य ( Priority ) देण्याच्या प्रश्नाचा विचार चालू असल्यास; ( क ) नियम नं. ८ अन्वये एखाद्या आक्षेपाचा विचार चालू असल्यास; (ड) नियम नं. १६ अन्वये प्रश्न विचारले गेल्यास; . (ई) सभा अगर विषयतहकुबीच्या सूचना आल्यास; । ३६. मूळ सूचना व उपसूचनांवर मते घेणे :–जेव्हा एखाद्या ठरावास एकच उपसूचना आली असेल तेव्हां प्रथम ती उपसूचना मतास घालण्यात येईल. एकापेक्षा अधिक उपसूचना आल्यास मांडलेल्या उपसूचना अध्यक्षांना योग्य वाटेल अशा क्रमाने मतास घालण्यात येतील, एखादी उपसूचना मंजूर झाल्यास सदर उपसूचना अखेरचा ठराव म्हणून मतास घालण्यात येईल, जर एकही उपसूचना पास झाली नाही तर मूळ ठराव (सूचना) मतास घालावी. मात्र ज्या उपसूचनेला सभेची अधिक अनुकूलता आहे असे अध्यक्ष यांना वाटेल तिला प्राधान्य देण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. जर एखादी उपसूचना सर्वानुमते पास झाली तर तो एकदम शेवटचा ठराव (सबस्टॅटिव्ह प्रापोझिशन) म्हणून समजला जावा, व त्यावर अधिक चर्चा न करता तोच सभेचा ठराव म्हणून वृत्तांतांत दाखल करण्यात यावा. ३७, मते कशी मोजाव:-(१) साधारण रीतीने मते घ्यावयाची ती हात मोजून घ्यावी, परंतु विशिष्ट प्रसंगी अध्यक्षांनी ठरविल्यास बॅलटने ( गुप्त रीतीने ) मते घ्यावीत. | (२) कमिटी नेमण्याबाबत अगर अधिकारी नेमण्याबाबत बॅलटच्या पद्धतीने मते घ्यावयाची असतील तर हजर असलेल्या प्रत्येक सभासदास, जितक्या रिकाम्या जागा भरावयाच्या असतील तितकी मते देण्याचा अधिकार आहे; परंतु कोणत्याही उमेदवारास एकाहून अधिक मते दिल्यास ती ग्राह्य समजली जाणार नाहींत. (३) मतमोजणी होत असतांना सभासदांनी शांतता राखावी व मतमोजणीचा निकाल जाहीर करीपर्यंत कोणीही आपली जागा सोडू नये. | ३८. मते दिलीच पाहिजेत असे नाहीं:-हजर असलेल्या सभासदां