पान:सभाशास्त्र.pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९७ पुणे शहर म्युनिसिपालिटीने केलेले नियम

- हा क्रम जितक्या जागा तितकेच उमेदवार शिल्लक राहीतोंपर्यंत चालू ठेवावा. आणि अशा रीतीने शिल्लक राहणारे उमेदवार निवडून आल्याचे जाहीर करण्यांत यावे. ४३. अंदाजपत्रक इत्यादींवर मते घेणे ः–जेव्हां अंदाजपत्रक, अथवा पुरवणी अंदाजपत्रक, अथवा रकमा वर्ग करण्याचा ठराव, अथवा नियम अगर पोटनियम मंजूर करणेचा ठराव, अथवा जमिनीच्या खरेदी अगर विक्रीबाबतची यादी, अथवा सूट देणेबाबतची यादी, अथवा थकबाकी याबाबतचे ठराव, अथवा म्युनिसिपालिटीच्या हिशोबाबाबतचे ठराव, अथवा म्युनिसिपालिटीच्या वार्षिक अहवालाचे ठराव, अथवा अशाच प्रकारचे दुसरे विषय जनरल कमिटीपुढे मांडण्यात येतील त्या वेळी अध्यक्षांनी त्यांस सोईचे दिसेल त्या त-हेने निरनिराळ्या बाबी एकत्र कराव्या व त्या बाबतींत सूचना मांडणार व अनुमोदन देणार यांची अपेक्षा न करतां वर सांगितलेल्या प्रत्येक बाबीचा समूह अनुक्रमानें “ हा समूह कायम करावा” असे म्हणून सभेपुढे मांडावा. जर त्यावर कांहीं उपसूचना आली नाहीं व तिला अनुमोदन मिळून ती मंजूर करण्यांत आली नाही, तर अध्यक्षांनी सुचविल्याप्रमाणे समूह कायम करण्यांत आले आहेत असे समजले जाईल, (अ) मात्र जर दोन अगर दोनहून अधिक सभासदांनीं तशा प्रकारची विनंती केली तर अध्यक्ष हे त्या समूहाचे पोट-विभाग करतील अगर त्यांची निराळी रचना करतील. ( ब ) तसेच अध्यक्षांनी सभेचा सेन्स (अभिप्राय ) घेतां हजर असलेल्या सर्व सभासदांनीं, कोणतीही बाब अगर समूह स्वतंत्र विचारांत घेऊ नये असे मत प्रदार्शत केल्यास सर्व निरनिराळ्या बाबी एकच ठराव आहे असे समजण्यांत येईल. ' ४४. महत्त्वाचे अगर कित्येक वर्षे चालू राहणारे कार्यक्रम :- कित्येक वर्षे चालू राहणारे कार्यक्रम अगर महत्त्वाचे विषय याबाबत म्युनिसिपालिटीस आपल्या धोरणाच्या सातत्याचे दृष्टीने या नियमाप्रमाणे तरतूद करावी असे वाटल्यास खालील कार्यपद्धति अवलंबावीः ज्या ज्या इसमाचा संबंध येण्याचा संभव आहे अशा सर्व लोकांना कळेल अशा प्रकारे, ज्या तारखेस अगर तारखेनंतर सदर प्रोग्राम अगर विषय चर्चेस घेतला जाईल त्या तारखेची नोटीस देऊन प्रोग्राम अगर विषय प्रसिद्ध