पान:सभाशास्त्र.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सभाशास्त्र २९४ ހރނގނވރކޅގތރތކރ.އއ.އއގހރނނވގތކށވއތރވގނނވ.ފރރރރރ भरणाच्या जनरल कमिटीच्या पहिल्या जनरल सभेच्या कार्यक्रमपत्रिकेव घेण्यांत येईल, (३ ) तसेच ज्या प्रश्नाचा विचार दोन वेळां तहकूब ठेवला गेला असेल त्या प्रश्नाचा विचार तहकूब ठेवण्याविषयींची सूचना पुन्हा मांडण्यास परवानगी देण्यात येणार नाहीं. (४) तसेच सभासद भाषण करीत असतांना वादविवादावरील अगर सभेची तहकुबी घेता येणार नाहीं; (५) तसेच पूर्वीच्या तहकुबीच्या सूचनेनंतर पुन्हा दुसरी तहकुबीची सूचना, मध्ये तीस मिनिटे झाल्याखेरीज, आणता येणार नाहीं. ३२. तहकूब वादविवाद पुन्हा सुरू करणेः–एखाद्या तहकूब केलेल्या वादविवादास पुन्हा जेव्हा सुरवात होईल त्या वेळी चर्चा तहकूब होण्यापूर्वी जो सभासद सभेस उद्देशून भाषण करीत असेल त्यास प्रथम बोलण्याचा हक्क दिला जाईल, ३३. वेळः–कोणाही सभासदाने कोणत्याही प्रसंगी पांच मिनिटांपेक्षा जास्त वेळ बोलू नये; मात्र मुख्य ठराव अगर उपसूचना मांडणाराला सुरवातीचे भाषण दहा मिनिटेंपर्यंत करता येईल, व तसेच अध्यक्ष यांना योग्य वाटल्यास कोणाही सभासदास कमाल १५ मिनिटेंपर्यंत बोलण्यास परवानगी देतां येईल. ३४. क्लोझरः—नियम नं. ३५ मध्ये दिलेला कोणताही मजकूर असला तथापि बजेटशिवाय इतर कोणत्याही विषयावरील चर्चा संपल्यावर, वादविवाद न करतां, अध्यक्ष अगर इतर म्युनिसिपल सभासद यांस ‘आतां प्रश्न मतास टाकण्यांत यावा अशी सूचना देता येईल. सदरच्या सूचनेस अनुमोदन मिळाल्यास, परंतु सूचना नियमबाह्य नाहीं अगर त्यामुळे अल्पसंख्याकांचे हक्कांवर गदा येत नाही अशी अध्यक्ष यांची खात्री झाल्यास, ती ताबडतोब मतास टाकण्यात येईल, सूचना पास झाल्यास अध्यक्ष खाली नमूद केल्याप्रमाणे, सभेपुढे असलेल्या कामाबाबत मते घेतील. क्लोझरची सूचना नामंजूर झाल्यास १५ मिनिटे झाल्याखेरीज ती पुन्हा सभेपुढे मांडतां येणार नाही :- ३५. कांहीं विषयांवर भाषण करणेबाबत निबंधः-खालील विषयांवर वादविवाद अगर भाषण करणेस परवानगी देण्यात येणार नाहीं :-